बदली आदेशांना पोलिसांचा विरोध

बरीच वर्षे एकाच ठिकाणी ‘ठाण’ मांडले!

गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी)

गोवा पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदली आदेश तातडीने अंमलात येत असताना, हवालदार आणि त्याखालील पोलिस शिपाई मात्र या आदेशांकडे दुर्लक्ष करत जुन्याच ठिकाणी कार्यरत राहण्याचा प्रयत्न करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या काही वर्षांत अनेकदा बदली आदेश जारी करण्यात आले, मात्र अनेक पोलिस कर्मचारी नव्या ठिकाणी हजर न राहता जुन्याच ठिकाणी कार्यरत राहिले आहेत. विशेषतः एकाच ठिकाणी अनेक वर्षे कार्यरत असलेल्या काही पोलिस शिपायांनी त्या परिसरात स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे.
बदली आदेशांची अवहेलना
गेल्या पाच महिन्यांत विभागाने तीन वेळा बदली आदेशांच्या अमलबजावणीसंबंधीची स्मरणपत्रे पाठवली असून, वेतन कपातीचा इशारा दिला आहे. मात्र, अनेक कर्मचारी या आदेशांकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
एक हजारांहून अधिक कर्मचार्‍यांनी कागदपत्रांमध्ये नवीन पद स्वीकारल्याची नोंद दाखवली आहे, परंतु प्रत्यक्षात ते जुन्याच ठिकाणी हजेरी लावत आहेत.
एप्रिल २०२५ मध्ये पोलिस मुख्यालयाने २०२० ते २०२५ दरम्यान बदली करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना त्वरित कार्यमुक्त करण्याचा आदेश जारी केला आहे.
पोलिस विभागात मोठे बदल
नव्याने भरती झालेले आणि प्रशिक्षण पूर्ण केलेले ८५९ पोलिस शिपाई विविध पोलिस ठाण्यांत नियुक्त झाले आहेत.
त्याशिवाय २ निरीक्षक, ३४ उपनिरीक्षक आणि ५६५ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ६० पोलिस कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे, ज्यामुळे व्यवस्थापन सुधारण्यात मोठी मदत होणार आहे.
आगशीच्या शिपायाचा विक्रम
आगशी पोलिस स्थानकावर एक शिपाई गेली १२ वर्षे ह्या पोलिस स्थानकावर ठाण मांडून आहे. आत्तापर्यंत त्याची बदली झालेल्या ठिकाणी न जाता तो एकाच ठिकाणी आहे. वरिष्ठांची खास मर्जी प्राप्त या शिपायाने आपली झालेली बदली रद्द करून आता नव्या बदली आदेशात पुन्हा आपली बदली आगशीतच करून दाखवत आपल्या ताकद दाखवून दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • Related Posts

    सरकारची सरपंचांना थेट धमकी ?

    आदेशांचे पालन न करणाऱ्यांवर होणार कारवाई गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी) सरकारने वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचे पालन न करणाऱ्या सरपंच आणि सचिवांविरोधात कारवाई करण्याचा इशारा पंचायतमंत्री माविन गुदीन्हो यांनी दिला आहे.इएचएन…

    अबब ! ५३ लाख रुपये कुणाच्या खात्यात ?

    लिंक रोड विशेष भूसंपादन अधिकारी गोत्यात गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी) मोपा विमानतळ लिंक रोडसाठी भूसंपादन केलेल्या जमिनीबाबत श्रीमती ललिता लक्ष्मण तुळसकर यांच्याच्या नावे जमिनीची मालकी सिद्ध झालेली नसताना, केवळ “एक…

    One thought on “बदली आदेशांना पोलिसांचा विरोध

    1. याच्या बद्दल वाचून मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. पोलिस विभागातील बदली आदेशांकडे दुर्लक्ष का केले जाते? हे कायद्याच्या दृष्टिकोनातून कसे बघितले जाईल? मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा करण्याची गरज का आहे? कारापूर-साखळी येथील प्रकल्पाच्या जमिनीच्या मालकीवरून भाऊबंदकी का सुरू आहे? आरोग्यमंत्री विश्वजीत यांचा या प्रकरणात काय भूमिका आहे? हे सर्व प्रश्न उत्तरे शोधण्यासाठी आणखी माहिती आवश्यक आहे. तुमच्या मते, या प्रकरणात कोणता पक्ष जबाबदार आहे?

      आम्ही libersave ला आमच्या प्रादेशिक कूपन प्रणालीमध्ये समाविष्ट केले आहे. विविध प्रदात्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र करणे किती सोपे आहे, हे पाहून खूप छान वाटते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    30/07/2025 e-paper

    30/07/2025 e-paper

    डेल्टीनचा पुळका नेमका कुणाला?

    डेल्टीनचा पुळका नेमका कुणाला?

    सरकारची सरपंचांना थेट धमकी ?

    सरकारची सरपंचांना थेट धमकी ?

    29/07/2025 e-paper

    29/07/2025 e-paper

    प्रशासन बनले ‘सैराट’…

    प्रशासन बनले ‘सैराट’…

    अबब ! ५३ लाख रुपये कुणाच्या खात्यात ?

    अबब ! ५३ लाख रुपये कुणाच्या खात्यात ?
    error: Content is protected !!