बनावट “विल”; पोलिसांची भूमिका संशयास्पद?

गुन्हा नोंदवण्याबाबत हलगर्जीपणा भोवणार

गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी)

धारगळ-दाडाचीवाडी येथील एका जमिनीवर दावा करण्यासाठी कुटुंबातील सदस्याने बनावट वसीयतपत्र (विल) तयार करून ती जमीन आपल्या नावावर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी दोन पोलिस निरीक्षक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण त्यांनी गुन्हा नोंदवण्यात अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला आहे.
विलचा उगम आणि वाळपई उपनिबंधकांची कारवाई
गणपत गोवेकर यांनी वाळपई उपनिबंधक कार्यालयाकडे विलसंबंधी माहिती मागवली. त्यावर वाळपई उपनिबंधकांनी स्पष्ट केले की असे विल त्यांच्या कार्यालयात नोंदच झालेले नाही. गोवेकर यांनी सुभाष कानुळकर यांनी तयार केलेल्या बनावट विलाची प्रत उपनिबंधकांच्या नजरेला आणून दिल्यानंतर वाळपई उपनिबंधक कार्यालयाचे शिक्के आणि अनेक अधिकाऱ्यांची नावे त्यावर वापरल्याचे दिसून आले.
वाळपई उपनिबंधकांनी हा प्रकार राज्य निबंधकांच्या निदर्शनास आणला, आणि राज्य निबंधकांनी वाळपई पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्याची शिफारस केली. त्यानुसार, तत्कालीन वाळपई उपनिबंधक गौरेश बुगडे यांनी ११ नोव्हेंबर २०२२ रोजी तक्रार दाखल केली होती, पण आजतागायत गुन्हा नोंद झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पेडणे पोलिस निरीक्षकांकडून चालढकल
शांताराम कानुळकर यांच्या मुलींनी वाळपई उपनिबंधक कार्यालयाकडे खातरजमा करून, पेडणे पोलिस स्थानकात सुभाष कानुळकर याच्याविरोधात २७ नोव्हेंबर २०२३ रोजी तक्रार दाखल केली. पण पेडणेचे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली.
अखेर तक्रारदारांनी पेडणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली, ज्यामुळे ३१ जुलै २०२४ रोजी गुन्हा नोंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला. त्यानंतर १२ ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हा नोंद झाला.
परंतु संशयिताला अटक करण्यासही पोलिसांनी उशीर केला. सुरुवातीला जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मदत केली गेली, पण तिथे जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जाण्यासाठीही संधी दिली.
खंडपीठाने चौकशीला सहकार्य करण्याच्या अटीवर संशयिताला अटकपूर्व जामीन मंजूर केला, पण त्यानंतर पेडणे पोलिसांनी चौकशीसाठी विशेष रस दाखवला नाही.
वाळपई पोलिसांचे दुर्लक्ष
वाळपई उपनिबंधक कार्यालयाने दाखल केलेल्या तक्रारीची दखल वाळपई पोलिसांनी घेतली नाही. पीडित कुटुंबाने नव्याने पोलिस तक्रार दाखल केली आहे.
तत्कालीन वाळपईचे पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते यांनी हे प्रकरण तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक गड्डी यांच्याकडे पाठवले होते, पण गड्डी यांनी गुन्हा दाखल केला नसल्याचे आता समोर आले आहे.
वाळपईचे विद्यमान पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांनी नव्याने दाखल झालेल्या तक्रारीवर लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

  • Related Posts

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    धारगळ बनावट विल प्रकरणी पीडितांची ससेहोलपट गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी) इंडिया जस्टीस रिपोर्टच्या ताज्या अहवालात गोवा हे लहान राज्यांमध्ये न्यायदानाच्या बाबतीत सर्वात शेवटच्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि आता,…

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    खाण घोटाळ्यावरून भाजपची नाचक्की गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी) केंद्रातील काँग्रेस सरकारने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती एम. बी. शहा आयोगाच्या अहवालानुसार, गोव्यात तब्बल ३५ हजार कोटी रुपयांचा खाण घोटाळा अखेर आता…

    One thought on “बनावट “विल”; पोलिसांची भूमिका संशयास्पद?

    1. गुन्हा नोंदवण्याबाबत हलगर्जीपणा आणि यश फडतेच्या कामगिरीचा जयजयकार या दोन्ही बातम्या मनाला खूप प्रभावित करणाऱ्या आहेत. पहिल्या बातमीत जमिनीच्या दाव्यासाठी बनावट वसीयतपत्र तयार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे, जो गंभीर आहे आणि यावर कठोर कारवाई व्हायला हवी. दुसरीकडे, यश फडतेच्या यशस्वी कारकिर्दीमुळे भारताचे नाव उंचावले आहे, आणि त्याची कामगिरी प्रेरणादायी आहे. दोन्ही घटना समाजाच्या वेगवेगळ्या बाजू दाखवतात – एक बाजू गंभीर आणि चिंताजनक, तर दुसरी बाजू आनंददायी आणि गर्वाची. यश फडतेच्या यशामुळे आपल्या युवकांना प्रेरणा मिळणे अपेक्षित आहे, परंतु गुन्ह्यांच्या प्रकरणांवरही लक्ष दिले पाहिजे. अशा घटनांवर काय प्रतिक्रिया आहे? तुमच्या मते, यश फडतेच्या यशाने नवीन पिढीवर कसा परिणाम होईल? सामाजिक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे का?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    01/07/2025 e-paper

    01/07/2025 e-paper

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    30/06/2025 e-paper

    30/06/2025 e-paper

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    हे नेमकं चाललंय काय?

    हे नेमकं चाललंय काय?
    error: Content is protected !!