दमदार, दिलदार, झुंजार, जिद्दी दामू..!!

पक्षाचा सामान्य कार्यकर्ता, गोवा प्रदेश भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष, गोवा राज्य भाजपाचा सरचिटणीस तसेच प्रवक्ता या नात्याने त्यांनी प्रभावी कामगिरी केली.

भारतीय जनता पक्षाचे नूतन अध्यक्ष दामू नाईक शनिवारी कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यानिमित्त त्यांच्या झुंजार, लढवय्या, तत्त्वनिष्ठ, ध्येयनिष्ठ नि प्रखर राष्ट्रवादाचा वसा जपत असताना व आज अध्यक्ष पदापर्यंत झेप घेत असताना त्यांच्या संघर्षमय जीवन व राजकीय वाटचालीचा थोडक्यात आलेख.
गोवा प्रदेश भाजपाध्यक्षपदी फातोर्ड्याचे माजी आमदार दामू नाईक यांची निवड निश्चित झाल्यावर काणकोणपासून पेडण्यापर्यंतच्या भाजपाच्या जुन्या जाणत्या, सच्च्या, निष्ठावंत व निस्वार्थी कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः नवचैतन्य पसरले व आनंदाचे उधाण आले. शेकडो कार्यकर्त्यांना तर आपण स्वतःच अध्यक्ष झाल्यासारखा परमानंद झाला. दुखावलेले व विविध कारणांमुळे पक्षापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना आपण पुन्हा नव्या जोमाने काम करावे अशी उर्मी दाटून आली. अतिशय प्रतिकूल व कठीण परिस्थितीतून वर आलेल्या दामू नाईक यांनी विलक्षण संघर्ष करून आजपर्यंतची मजल गाठली आहे. बालपणीची विलक्षण गरिबी त्यांचे जीवन होरपळून टाकत होती. पण त्या प्रतिकूल परिस्थितीतही दामू खचला नाही, पिचला नाही. कधी पाववाला, कधी दूध विक्रेता तर कधी सायकलवरून गावभर, शहरभर पेपर विक्रीचे काम तर कधी बस कंडक्टर बनून त्याने अर्थार्जन व त्याच्या जोडीने ज्ञानार्जन केले.
वयाच्या सहाव्या वर्षी संघाच्या शाखेवर पहिले पाऊल टाकलेल्या दामूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्वलंत राष्ट्रवादी विचार व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची एकात्म मानवतावादी विचारसरणी आत्मसात केली. १९९४ पासून आजतागायत भारतीय जनता पक्षाची तन, मन, धन अर्पून सर्वशक्तीनिशी निस्वार्थपणे सेवा केली. २००२ व २००७ या दोन विधानसभा निवडणुकीत फातोर्डा मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. आपल्या दोन्ही कार्यकाळात विधानसभेत अभ्यासपूर्ण प्रश्न व भाषणांनी विधानसभेत त्यांनी स्वतःचा आगळावेगळा ठसा उमटवला. तदनंतरच्या विधानसभा निवडणुकीत सलग पराभव पत्करावा लागला तरी न खचता त्यांनी आणखीन जोरदारपणे पक्षाचे कार्य पुढे नेले. पक्षाचा सामान्य कार्यकर्ता, गोवा प्रदेश भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष, गोवा राज्य भाजपाचा सरचिटणीस तसेच प्रवक्ता या नात्याने त्यांनी प्रभावी कामगिरी केली.
असे असताना ही पक्षातील काही हितशत्रूंनी त्यांच्या मार्गात काटे पेरण्याचा प्रयत्न केला. पण या सर्व गोष्टींना दमदार दामू पुरून उरले. आज ते पक्षाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारत असताना पक्ष सत्तेत असला तरी पक्षातील चैतन्य हरवले आहे. पक्षाची वाढ नव्हे सूज आलेली असताना पक्ष पुन्हा पूर्वीसारखा चैतन्यमय करण्याचे व पक्षाच्या सच्च्या कार्यकर्त्यांना न्याय, मानसन्मान प्राप्त करून देण्याचे कडवे आव्हान त्यांच्यापुढे आहे. पक्षामध्ये केवळ स्वार्थासाठी आलेल्या मंत्रीपदे बळकावून बसलेल्या काही बेलगाम नेत्यांनी मागच्या महिन्याभरात जे अकलेचे तारे तोडले त्यामुळे पंतप्रधान मोदी व अमित शहा ही खडबडून जागे झाले असतील. हजारो देव दुर्लभ कार्यकर्त्यांचा व अनेक प्रतिभावान नेत्यांचा भरणा असलेल्या भाजपात एकही नेता भाजपात विद्यमान अध्यक्षाशिवाय एकही नेता पात्र नाही हे माविन गुदिन्हो व इतर दोन नेत्यांचे बेजबाबदार विधान भारतीय जनता पक्षाचा व त्याच्या हजारो सच्च्या कार्यकर्त्यांचा ढळढळीत अपमान करणारा आहे. या विधानाची गंभीरपणे दखल घेऊन मोदी व शहा यथावकाश जालीम शस्त्रक्रिया करतीलच असा विश्वास सच्च्या कार्यकर्त्यांना आहे. या बेताल विधाने करणाऱ्या नेत्यांचा बोलवता धनी कोण याचा ही थांगपत्ता दिल्लीश्वरांना लागल्याचा सुगावा आम्हाला पत्रकार या नात्याने लागला आहे.
दामू नाईक यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर जुना भाजप पुन्हा जागा झाल्याचे चित्र सगळ्यांना निश्चितच दृष्टीस पडेल असा प्रामाणिक कार्यकर्त्यांना विश्वास आहे. पक्षाच्या अनेक माजी अध्यक्षांपैकी श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर व राजेंद्र आर्लेकर यांनी जी दिव्य दिशा दाखवली व ज्या सदानंद शेट तानावडे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली त्या मार्गाने दामू नाईक मार्गक्रमण करून दामू नाईक पक्षाला खऱ्या अर्थाने शक्तिशाली बनवतील असा खास विश्वास वाटतो. परमेश्वराने त्यासाठी त्यांना उदंड बळ द्यावे ही प्रार्थना आणि त्यांच्या अध्यक्षीय वाटचाल यशस्वी व्हावी यासाठी शुभेच्छा..!!

  • संगम गोविंद भौंसुले
  • Related Posts

    श्री देव खाप्रेश्वर; भाजपच्या रसातळाची नांदी

    शासन आज चुकीच्या मार्गाने जात आहे हे नजरेसमोर ठळक दिसत असतानाही विश्वजित राणे, सुदीन ढवळीकर, सुभाष शिरोडकर, रवी नाईक तथा देव देवतांवर सदैव श्रद्धा असणारे दिगंबर कामत यांच्यासारखे दिग्गज नेते…

    होळी – साधनेची रात्र

    संपूर्ण निर्मिती हा ऊर्जेचा साक्षात्कार आहे. सृजनातील प्रत्येक वस्तू, सर्व लोक (अस्तित्वाची परिमाणे) आणि युगे (काळाची परिमाणे) ऊर्जा रूपात अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे जीवसृष्टी केवळ पृथ्वीवरच अस्तित्वात आहे आणि स्वर्गीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    14/03/2025 e-paper

    14/03/2025 e-paper

    शांतता कोर्ट चालू आहे!

    शांतता कोर्ट चालू आहे!

    बेकायदा बांधकामे: राज्य सरकारसमोर पेच

    बेकायदा बांधकामे: राज्य सरकारसमोर पेच

    13/03/2025 e-paper

    13/03/2025 e-paper

    टीसीपीच्या वादग्रस्त १७ (२) कलमाची होळी

    टीसीपीच्या वादग्रस्त १७ (२) कलमाची होळी

    सरकारच्या प्रामाणिकतेवर सीएची मोहोर

    सरकारच्या प्रामाणिकतेवर सीएची मोहोर
    error: Content is protected !!