कुंकळ्ळीतील प्रदूषणामुळे रोगराईचा फैलाव

विरोधी पक्षनेते आलेमाव यांचे आरोग्य मंत्र्यांना पत्र

* २८ जणांना श्वसनाचा त्रास
* २९ जणांना त्वचारोग
* ११ जणांना दम्याने ग्रासले

* कर्करोग, क्रोनिक किडनी रोग, सायनस आणि क्षयरोगाशी लढणारे रुग्ण

मडगाव, दि. ११ (प्रतिनिधी)

प्राथमिक आरोग्य केंद्र- बाळ्ळीच्या सर्वेक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना पत्र लिहून पालिका क्षेत्रात व्यापक आरोग्य परिणाम सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.
बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतलगतच्या परिसरातील सुमारे ४४९ घरांचे सर्वेक्षण केले असून, त्यात औद्योगिक प्रदूषणामुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासल्याची माहिती समोर आली आहे.
या सर्वेक्षणात लोकांनी प्रदूषण, दुर्गंधीच्या तक्रारी केल्या असून त्यांना अॅलर्जी असल्याची तक्रार केली आहे. नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा युरी आलेमाव यांनी उपस्थित केला होता. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी कुंकळ्ळी नगरपालिका क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अहवालानुसार, त्यांनी शिंपल्यार, केगडीकोटो, मास्कोणी, बेलाथेंब, गुळ्यांकोटो, भाटी, ताकाबांद आणि आयडीसीमध्ये हे सर्वेक्षण केले आहे. आता पालिका क्षेत्रात सर्वेक्षण करण्याची मागणी आलेमाव यांनी केली आहे.
या अहवालानुसार सुमारे २८ जणांना श्वसनाचा त्रास, २९ जणांना त्वचेची अॅलर्जी, ११ जणांना अस्थमा, एकाला क्रोनिक किडनीचा आजार, ८ जणांना सायनसचा त्रास, दोघांना क्षयरोगाचा पूर्वीचा इतिहास, एकाला सोरायसिस, तर काहींनी धुळीची अॅलर्जी आणि डोळ्यांना जळजळ झाल्याची तक्रार केली आहे. क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज देखील आढळला आहे.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत टाकण्यात येणाऱ्या धोकादायक कचऱ्याबरोबरच कुंकळ्ळीमधील पाणी आणि वायू प्रदूषणाची वाढती पातळी, विशेषत: मत्स्य प्रक्रिया युनिट्स, कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील पोलाद निर्मिती युनिट्समुळे लोकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, या प्रकरणी ताबडतोब निर्णय घेण्याची मागणी युरी आलेमाव यांनी केली.

  • Related Posts

    बनावट “विल” आणि अधिकाऱ्यांचे “डील”

    धारगळ – दाडाचीवाडी जमीन हडप प्रकरणाने खळबळ गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) धारगळ – दाडाचीवाडी येथील एका जमिनीवर दावा करण्यासाठी कुटुंबातीलच एका सदस्याने बनावट वसीयतपत्र (विल) तयार करून ती जमीन आपल्या…

    ऑपरेशन सिंदूर: ९० दहशतवाद्यांचा खात्मा

    ९ दहशतवादी तळ अवघ्या २५ मिनिटांत उद्ध्वस्त गांवकारी, दि.७ (प्रतिनिधी) भारतात युद्धसराव म्हणून मॉक ड्रिल सुरू असतानाच पहाटे १.०५ वाजता भारतीय संरक्षण दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    08/05/2025 e-paper

    08/05/2025 e-paper

    हे काय चाललंय ?

    हे काय चाललंय ?

    बनावट “विल” आणि अधिकाऱ्यांचे “डील”

    बनावट “विल” आणि अधिकाऱ्यांचे “डील”

    07/05/2025 e-paper

    07/05/2025 e-paper

    ऑपरेशन सिंदूर: ९० दहशतवाद्यांचा खात्मा

    ऑपरेशन सिंदूर: ९० दहशतवाद्यांचा खात्मा

    युद्ध नको मज बुद्ध हवा !

    युद्ध नको मज बुद्ध हवा !
    error: Content is protected !!