‘लाला की बस्ती’ जमीनदोस्त

सरकारी कारवाईने झोपडपट्टीवासीयांमध्ये भीती

गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी)

बार्देश तालुक्यातील थिवी मतदारसंघातील थिवी कोमुनिदादच्या अवचीनवाडा येथील वादग्रस्त ‘लाला की बस्ती’ या झोपडपट्टीतील सुमारे २५ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई आज सकाळी सुरू करण्यात आली. पाच पोलिस निरीक्षकांसह मोठा पोलिस फौजफाटा यावेळी तैनात करण्यात आला होता.
या कारवाईमुळे राज्यातील इतर ठिकाणच्या झोपडपट्टीवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निवाड्याचा आधार घेऊन आता ठिकठिकाणी ही कारवाई सुरूच राहील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांकडून जारी केलेल्या नोटिशींमध्ये ११ मार्च २०२५ नंतर कधीही ही बांधकामे पाडली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले होते, परंतु कारवाईसाठी अखेर १५ एप्रिल उजाडावा लागला.
वोटबँकचा वापर
थिवी मतदारसंघातील अवचीनवाडा येथील ‘लाला की बस्ती’ ही कायम राजकीय नेत्यांची वोटबँक राहिली आहे. सत्तेत असलेल्या नेत्यांकडून या वोटबँकेचा वापर केला गेला. आरजीपीने प्रारंभी हा विषय हातात घेतल्यामुळे ही वस्ती चर्चेत आली. यानंतर आरटीआय कार्यकर्ते आत्माराम गडेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा आधार घेऊन अशा बेकायदा घरांवर कारवाई करण्यासाठी मुख्य सचिवांना नोटीस जारी केली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.
ही कारवाई झाली नाही, तर अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा गडेकर यांनी दिला आहे. याशिवाय, म्हापसा आणि आसगांव कोमुनिदादच्या घरांचा विषय त्यांनी प्राधान्यक्रमाने लावून धरला आहे.

  • Related Posts

    १७ (२) नंतर आता ३९ (ए) कायद्याच्या कात्रीत

    प्रकरणाच्या निवाड्यावरच भवितव्य अवलंबून गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) राज्य सरकारने ३९(ए) अंतर्गत झोन बदलासंबंधी आलेल्या प्रस्तावांवर अंतिम अधिसूचना जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सर्व प्रस्तावांचे भवितव्य आता मुंबई…

    समग्र शिक्षा: कला शिक्षकांचा संघर्ष

    नेमणूक झाली, पण पगारच नाही! गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) गोवा समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील विविध शाळांमध्ये सुमारे शंभराहून अधिक कला शिक्षकांची नेमणूक शिक्षण खात्यातर्फे करण्यात आली आहे. मात्र, या…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    28/04/2025 e-paper

    • By Gaonkaari
    • एप्रिल 28, 2025
    • 3 views
    28/04/2025 e-paper

    आरजीपीचे आंदोलन आणि सरकार

    • By Gaonkaari
    • एप्रिल 28, 2025
    • 5 views
    आरजीपीचे आंदोलन आणि सरकार

    १७ (२) नंतर आता ३९ (ए) कायद्याच्या कात्रीत

    • By Gaonkaari
    • एप्रिल 28, 2025
    • 8 views
    १७ (२) नंतर आता ३९ (ए) कायद्याच्या कात्रीत

    तुम्ही चांगले कसे वागता ?

    • By Gaonkaari
    • एप्रिल 28, 2025
    • 5 views
    तुम्ही चांगले कसे वागता ?

    समग्र शिक्षा: कला शिक्षकांचा संघर्ष

    • By Gaonkaari
    • एप्रिल 26, 2025
    • 4 views
    समग्र शिक्षा: कला शिक्षकांचा संघर्ष

    आम्ही भारताचे लोक

    • By Gaonkaari
    • एप्रिल 26, 2025
    • 5 views
    आम्ही भारताचे लोक
    error: Content is protected !!