विरोधक हो जागे व्हा ?

राजकारणात चमत्कार अभावानेच घडतो पण म्हणून विरोधक आयच्या बिळावर नागोबा बनण्याची स्वप्ने पाहत असतील तर सत्ता अजूनही त्यांना दूरच असेल हे सांगण्यासाठी कुणा भविष्यकाराची गरज नाही.

राज्य विधानसभेच्या निवडणूकीला अद्याप दोन वर्षांचा कार्यकाळ असताना भाजपने आत्ताच निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे. पक्षाच्या संघटनात्मक फेररचनेचा भाग म्हणून मतदारसंघनिहाय मंडळ समित्यांची पुर्नरचना करण्यात आली आहे. या नव्या समित्यांना पदभार स्वीकारण्यासाठी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यांना सध्या निवडणूक प्रचार सभांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या कार्यकर्ता मेळाव्यांतील राजकीय नेत्यांची भाषणे ही प्रचारकाळातील भाषणांसारखी आक्रमक बनत चालली आहे. विशेष म्हणजे विरोधक काही अपवाद वगळता मुग गिळून गप्प असताना सत्ताधारी भाजप विरोधकांवर तोंडसुख घेताना पाहील्यानंतर हा विनोदच चालला आहे की काय,असेच वाटावे.
राज्यात सध्याच्या परिस्थितीत विरोधकांची भूमीका सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वीकारलेली आहे. फक्त ७ विरोधी आमदार आणि त्यात त्यांच्यात समन्वय आणि एकजुटीचा अभाव असल्यामुळे सत्ताधारी भाजपला चांगलेच रान मोकळे मिळाले आहे. विधानसभा अधिवेशनात काही प्रमाणात विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न होतो. पण विधानसभेबाहेर विरोधक कुठेच दिसत नाहीत. हल्ली झालेल्या विधानसभा अधिवेशनानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव कुठे सुट्टीवर गेलेत की काय,असा प्रश्न पडतो. आप आणि आरजीपीचे विरेश बोरकर वगळले तर विजय सरदेसाई हे देखील शांत असल्याचे दिसते. अर्थात एकसंघ विरोधी आवाजाच्या अभावी विरोधकांचा प्रभाव पडणे शक्य नाही. विरोधकांवर सरकार तुटून पडण्याचे सोडून विरोधकच एकमेकांवर तुटून पडू लागले तर सरकारसाठी ते सोयीचेच ठरेल.
या एकंदर परिस्थितीत सत्ताधारी भाजपने समाजमनावर एक संशयाचे वलय तयार केले आहे. विरोधक हे आतुन सरकारला फितूर आहेत,असे वातावरण तयार करण्यात ते यशस्वी ठरले आहेत आणि अशामुळे जनता देखील संभ्रमात सापडली आहे. सरकारी आणि प्रशासनाकडून कुठल्याच बाबतीत जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू नाहीत. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीसाठी लोकांना न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागत आहेत. भाजपच्या गोटात येऊन जोपर्यंत गळ्यात भगवे पट्टी घालणार नाहीत तोपर्यंत काहीच एकणार नाही,असा अप्रत्यक्ष संदेशच सरकारची कृती निर्देशीत करत आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत बरेच काही आपल्या भाषणांतून बोलत असतात. अंत्योदय, ग्रामोदय, सर्वोदय, स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर भारत, विकासीत भारत, विकसीत गोवा हे शब्द आता सर्वसामान्य गोंयकारांना तोंडपाठ झाले आहेत. या शब्दांचा अर्थ सामाजिक स्तरावर शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याचे प्रतिबिंब कुठेच दिसत नाही. अर्थात विरोधकांचे डोळे द्वेष, मत्सर किंवा हेव्याने आंधळे झाल्यामुळे त्यांना सरकारचे काम दिसत नाही,असा आरोप सरकार करू शकते. पण शेवटी जनतेलाच त्याचा निकाल लावावा लागेल.
सातत्याने एखादी गोष्ट जनतेच्या माथी मारली की आपोआप ती खरी वाटायला लागते. तो सातत्याचा अजेंडा भाजपने खूप प्रभावी पद्धतीने राबवला आहे. भाजपची संघटनात्मक रचना आणि त्यांचे नियमीत कार्य या अजेंडासाठी पुरेपुर त्यांना सहाय्यक ठरत आहे. आपल्या कार्यकर्त्यांमार्फत गावांगावात ते जनतेसमोर आभासी विकासाचे चित्र तयार करत असतात. या तुलनेत विरोधक सध्या कुठेच दिसत नाहीत. निवडणूकीत भाजपचा पराभव करण्यासाठी जी सज्जता विरोधकांत असायला हवी ती अजिबात दिसत नाही. राजकारणात चमत्कार अभावानेच घडतो पण म्हणून विरोधक आयच्या बिळावर नागोबा बनण्याची स्वप्ने पाहत असतील तर सत्ता अजूनही त्यांना दूरच असेल हे सांगण्यासाठी कुणा भविष्यकाराची गरज नाही. व्याकरणीय दुरूस्ती करा

  • Related Posts

    ʻमै झुकेगा नही सालाʼ !

    या एक वर्षाच्या प्रवासात आपण जशी साथ दिली, तशीच ती पुढेही चालू राहिली आणि त्यात अधिक भर पडली तर नक्कीच हा ʻगांवकारीʼचा प्रयोग मुक्त, स्वतंत्र पत्रकारितेचा एक नवा मानबिंदू ठरू…

    पिता-पुत्राकडून ‘स्मार्टसिटी’ चे वाभाडे

    भाजप सरकार, पक्षाचीही कोंडी गांवकारी,दि.१०(प्रतिनिधी) राजधानी पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात तसेच पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहीत मोन्सेरात या पिता-पुत्रांनी पणजी स्मार्टसिटीच्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे सरकार आणि भाजप…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    18/04/2025 e-paper

    • By Gaonkaari
    • एप्रिल 18, 2025
    • 2 views
    18/04/2025 e-paper

    18/04/2025 e-paper

    • By Gaonkaari
    • एप्रिल 18, 2025
    • 3 views
    18/04/2025 e-paper

    सामाजिक योजनांचे राजकारण नको?

    • By Gaonkaari
    • एप्रिल 18, 2025
    • 5 views
    सामाजिक योजनांचे राजकारण नको?

    मांद्रेत ९० व्हिलांना पंचायतीची मंजुरी

    • By Gaonkaari
    • एप्रिल 18, 2025
    • 7 views
    मांद्रेत ९० व्हिलांना पंचायतीची मंजुरी

    17/04/2025 e-paper

    • By Gaonkaari
    • एप्रिल 17, 2025
    • 5 views
    17/04/2025 e-paper

    ʻमै झुकेगा नही सालाʼ !

    • By Gaonkaari
    • एप्रिल 17, 2025
    • 6 views
    ʻमै झुकेगा नही सालाʼ !
    error: Content is protected !!