पर्यटकांनी गोवा गजबजला

किनारे फुल्ल, रस्ते पॅक पार्ट्यांचा झगमगाट

पणजी,दि.२८ (प्रतिनिधी)

सरत्या वर्षांला निरोप आणि नवीन वर्षांच्या स्वागतासाठी गोव्याकडे पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. किनारी भाग पर्यटकांनी गजबजले आहेत तर राज्यातील महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीतही वाढ झाली आहे. नवीन वर्षाच्या आरंभापर्यंत ही परिस्थिती राहणार असल्याने गोमंतकीयांना काही दिवस घरातच कोंडून राहण्याची वेळ आली आहे.
सनबर्नसाठी दक्षिणेतून उत्तरेकडे वाहतूक
यंदा पहिल्यांदाच सनबर्न महोत्सव उत्तरेत पेडणेतील धारगळ याठिकाणी होणार असल्याने दक्षिणेतून पूर्णपणे वाहतूक उत्तरेच्या दिशेने सरकणार आहे. वाहतुक पोलिसांनी यासंबंधी वाहतुक व्यवस्थापनाची जबाबदारी खांद्यावर घेतली असली तरी हा पहिलाच अनुभव राहणार असल्याने नेमकी काय परिस्थिती उदभवते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. पेडणेत सनबर्न असल्यामुळे शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ते आकर्षण ठरणार असल्याने तिथून मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओढा वाढण्याची शक्यता आहे. महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी वाहतुक पोलिसांनी घेतली असून त्या दृष्टीने पोलिसांनी नियोजन केले आहे.
दुखवट्यात सनबर्न कसा?
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने देशात आणि राज्यातही सात दिवसांचा दुखवटा पाळण्यात येत आहे. राज्यात दुखवटा असताना सनबर्नसारखा महोत्सव आयोजित होणे हे कितपत योग्य,असा सवाल काही विरोधक विचारत आहेत. हा सरकारी कार्यक्रम नाही. यासाठी नियोजन आणि प्रचंड प्रमाणात आर्थिक गुंतवणूक असल्याने तो रद्द करणे शक्य नाही. या विषयावर मतमतांतरे असली तरीही सरकारी दुखवटे हे निव्वळ तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यापूर्ती मर्यादित राहीले आहेत. किमान सरकारने दुखवटे जाहीर करताना तसे स्पष्टीकरण केल्यास किमान ते वादाचे विषय ठरणार नाहीत,अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • Related Posts

    दिल्लीकरांच्या तावडीतून गोव्याला वाचवा

    आरजीपी अध्यक्ष मनोज परब यांचे आवाहन पणजी, दि. १ (प्रतिनिधी) पोर्तुगीजांपासून भारताने गोव्याला मुक्त करून आता ६३ वर्षे झाली. आता भारतातीलच दिल्लीकरांच्या आक्रमणापासून गोव्याला वाचवण्याची वेळ आली आहे. दिल्लीकरांनी इथल्या…

    भेंब्रेंच्या ब्रह्मास्त्राने सिंह घायाळ

    प्रत्यूत्तरासाठी केंद्रीय समितीचा ढवळीकरांवर दबाव पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी आमदार एड. उदय भेंब्रे यांनी आपल्या एका व्हिडिओत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अप्रत्यक्ष भाऊसाहेब बांदोडकर आणि शशिकला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    04/02/2025 e-paper

    04/02/2025 e-paper

    04/02/2025 e-paper

    04/02/2025 e-paper

    कोण खरे, कोण खोटे ?

    कोण खरे, कोण खोटे ?

    काय बुवा हे आल्वारा प्रकरण?

    काय बुवा हे आल्वारा प्रकरण?

    03/02/2025 e-paper

    03/02/2025 e-paper

    महसूल खात्यात मॅडम चा धुमाकूळ

    महसूल खात्यात मॅडम चा धुमाकूळ
    error: Content is protected !!