राजकीय कनेक्शन कुठेच नाही

पोलिसांकडून राजकारण्यांना क्लीनचीट

पणजी,दि.१६(प्रतिनिधी)

राज्यात एकामागोमाग उघडकीस येणाऱ्या नोकऱ्यांसाठी पैसे उकळण्याच्या प्रकरणांत आत्तापर्यंतच्या तपासात कुठेच राजकीय कनेक्शन आढळून आले नाही. पोलिसांनी आज पत्रकार परिषदेतून हा निर्वाळा देत सर्वंच राजकारण्यांना क्लीनचीट देऊन अप्रत्यक्ष सरकारला दिलासा दिला आहे.
आज पोलिस महासंचालक अलोक कुमार, उत्तर गोवा पोलिस अधिक्षक अक्षत कौशल, दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक सुनीता सावंत यांच्या उपस्थितीत या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कॅश फॉर जॉब प्रकरणामुळे सरकारची बदनामी सुरू आहे आणि वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांचीही चर्चा सुरू असल्याने या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सर्व शक्यता फेटाळून राजकीय कनेक्शनची चर्चा खोटी असल्याचे सांगितले. या सर्व प्रकरणांची कसून चौकशी सुरू आहे आणि अजूनही लोकांना अटक होण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली.
उत्तरेत- १७ आणि दक्षिणेत- १२
आत्तापर्यंत उत्तर गोव्यात एकूण १७ तर दक्षिण गोव्यात १२ प्रकरणांची नोंद झाली आहे. एकूण २० लोकांना अटक करण्यात आली. या लोकांकडून वाहने, सोने आदी माल जप्त करण्यात आला आहे तर त्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. यांत दोन सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. या व्यवहारांत रोख आणि बँकेमार्फतही पैशांची देवाणघेवाण झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. दोन्ही जिल्ह्यांत मिळून आत्तापर्यंत ५० च्या आसपास पीडितांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. ही प्रकरणे २०१४ ते २०१५ च्या काळातील असून कोविड आणि त्यानंतर विधानसभा निवडणूकांमुळे नोकर भरती होऊ न शकल्यामुळेच ही प्रकरणे उघडकीस आली आहेत.
श्रीमंतीचा हव्यास आडवा आला
पुजा नाईक आणि दीपश्री सावंत गांवस या दोघांही महिलांना श्रीमंतीचा हव्यास होता. त्यांना एशआरामाच्या जीवनशैलीची आवड होती आणि त्यातूनच त्यांनी पैसा कमवण्यासाठी हा मार्ग चोखाळला, असे तपासात आढळून आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
एसआयटीबाबत अद्याप निर्णय नाही
नोकर भरती व्यवहारांच्या या प्रकरणांत विशेष पोलिस पथक स्थापन करण्यासंबंधी अद्याप निर्णय झालेला नाही. हे प्रकरण व्यवस्थितपणे तपासले जात आहे. पोलिस या सर्व प्रकरणांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिकाधिक पुरावे जमा करण्याचे कामही सुरू आहे. आपण राजकारण्यांचे जवळीक असल्याचे भासवून लोकांना गुंडवण्यात येत असल्याचेही यावेळी पोलिसांनी सांगितले.

  • Related Posts

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    धारगळ बनावट विल प्रकरणी पीडितांची ससेहोलपट गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी) इंडिया जस्टीस रिपोर्टच्या ताज्या अहवालात गोवा हे लहान राज्यांमध्ये न्यायदानाच्या बाबतीत सर्वात शेवटच्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि आता,…

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    खाण घोटाळ्यावरून भाजपची नाचक्की गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी) केंद्रातील काँग्रेस सरकारने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती एम. बी. शहा आयोगाच्या अहवालानुसार, गोव्यात तब्बल ३५ हजार कोटी रुपयांचा खाण घोटाळा अखेर आता…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    01/07/2025 e-paper

    01/07/2025 e-paper

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    30/06/2025 e-paper

    30/06/2025 e-paper

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    हे नेमकं चाललंय काय?

    हे नेमकं चाललंय काय?
    error: Content is protected !!