सत्तरीच्या राणे कुटुंबात गृहकलह

कारापूर – साखळी जमीन विक्रीवरून भाऊबंदकी

गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी)

सत्तरीच्या राणे कुटुंबात गृहकलह निर्माण झाला आहे. कारापूर-साखळी येथे एरिक्टर इन्फ्रा प्रा. लिमिटेड कंपनीला विक्री केलेल्या जमीन मालकीवरून भाऊबंदकी निर्माण झाली आहे. या विषयावरून श्रीमती हिराबाई इंदूराव राणे व इतर ६ जणांनी डिचोली सत्र न्यायालयात विशेष याचिका दाखल केली आहे. भू-बळकाव प्रकरणी चौकशी करणाऱ्या पोलिस विशेष तपास पथकाकडेही तक्रार दाखल केली आहे.
डिचोली सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची पहिली सुनावणी पूर्ण होऊन आता ९ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या याचिकेत एरिक्टर इन्फ्रा प्रा. लि., कारापूर इस्टेटस प्रा. लि., विश्वजीत प्र. राणे व इतर ५३ जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याशिवाय श्रीमती हिराबाई इंदूराव राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गोवा लोकायुक्त, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, दक्षता खाते तसेच भू-बळकाव प्रकरणांची चौकशी करणाऱ्या विशेष पोलिस पथकाकडेही दाखल केल्याची खबर आहे.
बहुचर्चित ‘वन गोवा’ प्रकल्प अडचणीत
कारापूर येथील एरिक्टर इन्फ्रा प्रा. लि. कंपनीला ही जमीन कारापूर इस्टेटस प्रा. लि. या कंपनीकडून विक्री करण्यात आली. या कंपनीचे संचालक राज्याचे नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे आणि त्यांची पत्नी, पर्येच्या आमदार डॉ. दीवया राणे आहेत. सुमारे ५.५ लाख चौ.मी या जमिनीत भव्य पंचतारांकित रहिवासी प्रकल्प उभा राहत असून त्यात विविध पंचतारांकित सुविधांसह मानवनिर्मित समुद्राचा समावेश आहे. लोढा कंपनीकडून या प्रकल्पाची जोरदार जाहिरात सुरू आहे. १५००हून अधिक भूखंड विक्रीसाठी उपलब्ध असून ५०० पेक्षा अधिक भूखंड यापूर्वीच विक्री करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
जमीन बेकायदा बळकावल्याचा आरोप
सत्तरीच्या राणे कुटुंबियांत केरी-सत्तरीच्या राणेंना ५० टक्के वाटा आहे, असा दावा त्यांनी केला आहे. कारापूर-साखळी येथील जमिनीत देखील ५० टक्के वाटा असूनही ही जमीन बेकायदा पद्धतीने तलाठ्याला हाताशी धरून विश्वजीत राणे यांनी १९९७ साली कारापूर इस्टेट कंपनीच्या नावे म्यूटेशन केल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. कारापूर इस्टेटस प्रा. लि. ही कंपनी १ जानेवारी १९९८ रोजी स्थापन झाली असताना, या कंपनीच्या नावे १९९७ सालीच म्यूटेशन कसे काय झाले? असा सवाल करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या लढ्याला बळ
कारापूर-साखळी येथील नियोजित वन गोवा प्रकल्पाविरोधात यापूर्वीच सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी सुरू असतानाच आता राणे कुटुंबियांकडूनच जमीन मालकीच्या विषयावरून डिचोली सत्र न्यायालयात नवी विशेष याचिका दाखल झाल्याने हा प्रकल्प रखडण्याची शक्यता अधिक वाढली आहे.

  • Related Posts

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    धारगळ बनावट विल प्रकरणी पीडितांची ससेहोलपट गांवकारी, दि. १ (प्रतिनिधी) इंडिया जस्टीस रिपोर्टच्या ताज्या अहवालात गोवा हे लहान राज्यांमध्ये न्यायदानाच्या बाबतीत सर्वात शेवटच्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि आता,…

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    खाण घोटाळ्यावरून भाजपची नाचक्की गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी) केंद्रातील काँग्रेस सरकारने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती एम. बी. शहा आयोगाच्या अहवालानुसार, गोव्यात तब्बल ३५ हजार कोटी रुपयांचा खाण घोटाळा अखेर आता…

    One thought on “सत्तरीच्या राणे कुटुंबात गृहकलह

    1. कारापूर-साखळी येथील जमीन विक्रीचा प्रश्न खरोखरच गंभीर आहे. राणे कुटुंबातील भाऊबंदकीने गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण केली आहे. एरिक्टर इन्फ्रा प्रा. लिमिटेड कंपनीला विक्री केलेल्या जमिनीच्या मालकीवरून असा विवाद का आला? सरकारातील आमदार आणि मंत्र्यांनी हा प्रश्न सोडवायला हवा, पण त्यांची कसोटी गांवकार्यांकडून का घेतली जात आहे? टॅक्सी व्यावसायिकांच्या आक्रमकतेच्या मागे केवळ एप अग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वंच का आहेत? हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने काय योजना आखली आहे? तुमच्या मते, या सर्व वादग्रस्त प्रश्नांचे उत्तर कसे मिळू शकेल?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    01/07/2025 e-paper

    01/07/2025 e-paper

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    न्यायदेवतेवरील विश्वासाची सत्वपरीक्षा

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    समाज कल्याण खात्याचे स्वागत

    30/06/2025 e-paper

    30/06/2025 e-paper

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    ३५ हजार कोटी ते ३०० कोटी !

    हे नेमकं चाललंय काय?

    हे नेमकं चाललंय काय?
    error: Content is protected !!