तुयेत ‘आयटी हब’ प्रकल्प !

आयपीबीकडून १७ हजार चौ. मी. गुंतवणूक क्षेत्र घोषित
——————————————————————————
गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) : पेडणे तालुक्यातील तुये येथे सुमारे साडेपाच लाख चौरस मीटर जमिनीवर उभारण्यात येत असलेला इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्प अद्याप पूर्णत्वास पोहोचलेला नसतानाच त्याच्या बाजूला आणखी एक आयटी हब प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन व सुविधा मंडळाने (जीआयपीएफबी) १७,४७४ चौरस मीटर क्षेत्र औद्योगिक गुंतवणूक क्षेत्र म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आधीच उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रॉनिक सिटीतील जमिनीचा वापर करण्याऐवजी नव्या प्रकल्पासाठी स्वतंत्र जमीन का घेतली जात आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तुये येथे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल उत्पादन उद्योगांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र या प्रकल्पाचा अपेक्षित विकास अद्याप झालेला नाही. अशा परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक सिटीच्या शेजारीच स्वतंत्र आयटी हब उभारण्याच्या प्रस्तावामुळे नव्या जमीन रूपांतरणाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, ट्रिनिटी टच इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ७ मे २०२६ रोजी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडे प्रस्ताव सादर केला होता. मंडळाने त्याला मान्यता देऊन संबंधित क्षेत्र औद्योगिक गुंतवणूक क्षेत्र म्हणून घोषित करण्याची शिफारस सरकारकडे केली आहे.

या क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान केंद्र उभारण्याबरोबरच इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल उत्पादन उद्योगांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे, औद्योगिक गुंतवणूक क्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर बांधकाम नियंत्रण, कर आणि शुल्कवसुलीचे काही अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मंडळाकडे हस्तांतरित होण्याची तरतूद आहे.

इलेक्ट्रॉनिक सिटीचा मूळ उद्देशच इलेक्ट्रॉनिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा असताना त्याच परिसरात त्याच स्वरूपाचा स्वतंत्र प्रकल्प कशासाठी, हा मुख्य प्रश्न आहे. आधीच्या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याऐवजी नव्या प्रकल्पांना मान्यता देण्यामागील सरकारची भूमिका स्पष्ट होण्याची गरज आहे.

  • Related Posts

    भाजयुमोच्या ‘सीएम ट्रॉफी २.०’ स्पर्धेचा शुभारंभ; एक लाख युवकांच्या सहभागाचे उद्दिष्ट

    गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) गोवा प्रदेशतर्फे आयोजित ‘सीएम ट्रॉफी २.०’ या राज्यव्यापी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या लोगोचे आणि नोंदणीसाठीच्या क्यूआर कोडचे शनिवारी पणजीत अनावरण करण्यात आले. राज्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एक लाखाहून अधिक युवकांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट भाजयुमोने ठेवले आहे.

    Heritage First Festival Opens in Panaji, to Showcase Goa’s Rich Cultural Legacy

    The Heritage First Festival inaugurated in Panaji celebrates Goa’s rich history and culture with 47 heritage walks and workshops across six locations until December 6.

    You Missed

    भाजयुमोच्या ‘सीएम ट्रॉफी २.०’ स्पर्धेचा शुभारंभ; एक लाख युवकांच्या सहभागाचे उद्दिष्ट

    भाजयुमोच्या ‘सीएम ट्रॉफी २.०’ स्पर्धेचा शुभारंभ; एक लाख युवकांच्या सहभागाचे उद्दिष्ट

    तुयेत ‘आयटी हब’ प्रकल्प !

    तुयेत ‘आयटी हब’ प्रकल्प !

    जमीन रूपांतरणाचा खेळ

    जमीन रूपांतरणाचा खेळ

    Heritage First Festival Opens in Panaji, to Showcase Goa’s Rich Cultural Legacy

    Heritage First Festival Opens in Panaji, to Showcase Goa’s Rich Cultural Legacy

    Former Goa CM Laxmikant Parsekar Returns to BJP Ahead of 2027 Assembly Elections

    Former Goa CM Laxmikant Parsekar Returns to BJP Ahead of 2027 Assembly Elections

    Pre-Primary Helpers Threaten Indefinite Agitation Over Pending Demands

    Pre-Primary Helpers Threaten Indefinite Agitation Over Pending Demands