भाजयुमोच्या ‘सीएम ट्रॉफी २.०’ स्पर्धेचा शुभारंभ; एक लाख युवकांच्या सहभागाचे उद्दिष्ट

गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) गोवा प्रदेशतर्फे आयोजित ‘सीएम ट्रॉफी २.०’ या राज्यव्यापी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या लोगोचे आणि नोंदणीसाठीच्या क्यूआर कोडचे शनिवारी पणजीत अनावरण करण्यात आले. राज्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एक लाखाहून अधिक युवकांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट भाजयुमोने ठेवले आहे.

या कार्यक्रमाला भाजपचे मुख्य प्रवक्ते तथा वास्कोचे आमदार दाजी साळकर, साळगावचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष केदार नाईक, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष तुषार केळकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

२०२२ मध्ये आयोजित पहिल्या सीएम ट्रॉफी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी सुमारे ४५ हजार स्पर्धकांनी नोंदणी केली होती. यंदा हा आकडा एक लाखाच्या पुढे नेण्याचा निर्धार भाजयुमोने व्यक्त केला आहे.

सीएम ट्रॉफी २.० अंतर्गत क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, कॅरम, समूह नृत्य, फुगडी, घुमट आरती, पथनाट्य, एकल गायन, रांगोळी आणि चित्रकला अशा एकूण १२ क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.

या स्पर्धेची सुरुवात २२ नोव्हेंबर रोजी नवीन झुआरी पुलावर आयोजित भव्य मॅरेथॉनने होणार आहे. या मॅरेथॉनमध्ये २१, १० आणि ५ किलोमीटर अशा तीन गटांचा समावेश असेल. मॅरेथॉनसाठी नोंदणीची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर आहे.

क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसाठी नोंदणी २५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून मतदारसंघ पातळीवरील स्पर्धा १ ते १० डिसेंबर या कालावधीत होणार आहेत.

सीएम ट्रॉफी ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून युवकांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच गोव्याची संस्कृती आणि परंपरा जपण्याचे व्यासपीठ असल्याचे आयोजकांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विकसित गोव्याच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या उपक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजयुमोतर्फे करण्यात आले आहे.

  • Related Posts

    महाराष्ट्रात कोंकणी अकादमी स्थापणार

    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा ——————————————————————– गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात कोंकणी अकादमी स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद…

    तुयेत ‘आयटी हब’ प्रकल्प !

    आयपीबीकडून १७ हजार चौ. मी. गुंतवणूक क्षेत्र घोषित —————————————————————————— गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) : पेडणे तालुक्यातील तुये येथे सुमारे साडेपाच लाख चौरस मीटर जमिनीवर उभारण्यात येत असलेला इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्प…

    You Missed

    महाराष्ट्रात कोंकणी अकादमी स्थापणार

    महाराष्ट्रात कोंकणी अकादमी स्थापणार

    भाजयुमोच्या ‘सीएम ट्रॉफी २.०’ स्पर्धेचा शुभारंभ; एक लाख युवकांच्या सहभागाचे उद्दिष्ट

    भाजयुमोच्या ‘सीएम ट्रॉफी २.०’ स्पर्धेचा शुभारंभ; एक लाख युवकांच्या सहभागाचे उद्दिष्ट

    तुयेत ‘आयटी हब’ प्रकल्प !

    तुयेत ‘आयटी हब’ प्रकल्प !

    जमीन रूपांतरणाचा खेळ

    जमीन रूपांतरणाचा खेळ

    Heritage First Festival Opens in Panaji, to Showcase Goa’s Rich Cultural Legacy

    Heritage First Festival Opens in Panaji, to Showcase Goa’s Rich Cultural Legacy

    Former Goa CM Laxmikant Parsekar Returns to BJP Ahead of 2027 Assembly Elections

    Former Goa CM Laxmikant Parsekar Returns to BJP Ahead of 2027 Assembly Elections