मद्यवाहू कंटेनरला महामार्गावर आग

चालक पसार, दारू तस्करीचा संशय

गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी)

राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील धारगळ येथे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या मद्यवाहू कंटेनरला अचानक आग लागली. कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले, तर आगीत चालकाचे कॅबीन पूर्णतः जळून खाक झाले.
प्राथमिक तपासाअंती, कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्या असून हा मद्य तस्करीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, आग आटोक्यात आणली. सकाळी ७:४८ वाजता धारगळ महाखाजन येथे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली, त्यानंतर सहायक अधिकारी प्रशांत धारगळकर, हवालदार प्रदीप असोलकर, चालक अलवारिस मास्करेन्हास, जवान केतन कामुलकर, शुभम कामत आणि तेजस आरोंदेकर यांनी घटनास्थळी तातडीने प्रतिसाद दिला.
अग्निशमक दलाच्या प्रयत्नांमुळे फक्त कॅबीन जळून खाक झाले आणि कंटेनरचे मोठे नुकसान टळले. दरवाजा उघडल्यावर आत मोठ्या प्रमाणात दारू साठवलेली असल्याचे दिसून आले. दारूच्या ७५० एमएल आणि क्वार्टरच्या बाटल्यांचे खोके आढळले, त्यामुळे तस्करीचा संशय अधिक बळावला.
पोलिस आणि अबकारी विभागाला तत्काळ माहिती देण्यात आली. चालकाने अचानक पलायन का केले? हा प्रश्न उपस्थित झाल्याने, ही दारू तस्करीचाच प्रकार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बाटल्यांवरील लेबल बनावट?
कंटेनरमध्ये सापडलेल्या दारूच्या बाटल्यांवरील लेबल बनावट असल्याची शक्यता आहे. मोठ्या बाटल्यांवर “एव्हरग्रीन रिझर्व्ह व्हिस्की” तर क्वार्टरच्या बाटल्यांवर “स्टँडर्ड रिझर्व्ह” असे लेबल आहे.
मोठ्या बाटल्यांवरील डिस्टिलरीचा पत्ता “भारत” असे दर्शवतो, तर क्वार्टरच्या बाटल्यांवर “मध्य प्रदेश” चा उल्लेख आहे, त्यामुळे ही बनावट दारू तयार करून गोव्याबाहेर पाठवली जात होती, असा संशय व्यक्त केला जात आहे. अबकारी खात्याकडून अधिकृत तपासानंतरच खरी माहिती समोर येणार आहे.

  • Related Posts

    आचारसंहितेआड सरकारने तोंड लपवले

    काँग्रेस, आरजीपीचा सरकारवर हल्लाबोल गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून फोंडा पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केल्याचा फायदा घेऊन विरोधकांच्या तावडीतून सुटण्यासाठीच सरकारने विधानसभा अधिवेशन आटोपते घेतले, असा हल्लाबोल काँग्रेस आणि…

    विरोधकांना हाकलून ३०,१९४ कोटी मंजूर

    फोंडा पोटनिवडणूक आचारसंहितेमुळे अधिवेशन आटोपले गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी) फोंडा पोटनिवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाल्याचे निमित्त साधून राज्य सरकारने चर्चेविनाच ३०,१९४ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय मागण्यांना मंजुरी दिली. हा लोकशाहीचा खून…

    You Missed

    17/03/2026 e-paper

    17/03/2026 e-paper

    17/03/2026 e-paper

    17/03/2026 e-paper

    17/03/2026 e-paper

    17/03/2026 e-paper

    विरोधकांनी भानावर यावे

    विरोधकांनी भानावर यावे

    आचारसंहितेआड सरकारने तोंड लपवले

    आचारसंहितेआड सरकारने तोंड लपवले

    विस्कळीत विरोधक, चालाख सरकार

    विस्कळीत विरोधक, चालाख सरकार