बिट्स पिलानीत ‘ड्रग्स’ पोहोचलेच कसे?

विरोधी पक्ष नेत्यांकडून सखोल चौकशीची मागणी


गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी)

देशातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या गोव्यातील बिट्स पिलानी संस्थेच्या गोवा कॅम्पसमध्ये ड्रग्सचा शिरकाव होऊन, मादक पदार्थांच्या सेवनामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
राज्याला ड्रग्सचा विळखा झपाट्याने पडत आहे. ड्रग्सच्या मास्टरमाइंडचा शोध घेण्याऐवजी, सरकार केवळ किरकोळ ड्रग्स पेडलर्सना पकडून कारवाईचे ढोल वाजवत आहे. पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेल्या ड्रग्सच्या बाजारपेठेने आता शैक्षणिक संस्थांमध्येही प्रवेश केला असून, त्यामुळे भावी पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे. सरकारची पोलिस यंत्रणा पूर्णतः निष्क्रिय ठरली आहे. ड्रग्स व्यवहाराबाबत सरकारची गुप्त यंत्रणा सतर्क असणे अत्यावश्यक आहे.
भाजपच्या कार्यकाळात सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच ड्रग्स, जुगार आणि वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन मिळत असून, त्यामुळे गोव्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम होत असल्याचा आरोप युरी आलेमाव यांनी केला.
व्यवस्थापनाला जाब विचारण्याची गरज
बिट्स पिलानीसारख्या संस्थेत गेल्या एका वर्षात पाच विद्यार्थ्यांचे अनैसर्गिक मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सदर घटनेत विद्यार्थ्याने मादक पदार्थांचे सेवन केल्याचे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाल्यामुळे, ही व्यवस्थापनाची दुर्लक्षाची बाब तर नाही ना, याचाही तपास होणे आवश्यक आहे. व्यवस्थापनाकडून अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात कुचराई झाली का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
विरोधकांनी अनेक वेळा इशारा दिला आहे की अंमली पदार्थ शैक्षणिक संस्थांमध्ये शिरले आहेत, परंतु सरकार मात्र गुन्हे उघडकीस आणल्याच्या कथा सांगण्यात व्यस्त असल्याचे दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला. गोवा पोलिसांनी हे स्पष्ट केले पाहिजे की ही या संस्थेतील पाचवी की सहावी विद्यार्थ्याच्या मृत्यूची घटना आहे, अशी मागणीही युरी आलेमाव यांनी केली.

चौकशी सुरू आहे- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्रकारांनी बिट्स पिलानीतील घटनेबाबत विचारले असता याबाबत पोलिस चौकशी सुरू आहे,अशा एका वाक्यात त्यांनी उत्तर दिले. या प्रकरणी अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दर्शवला.

  • Related Posts

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    South Goa MP Capt. Viriato Fernandes on Monday strongly raised the issue of families who surrendered their land for railway projects, demanding that Konkan Railway give them priority in manpower recruitment as well as allotment of shops at railway stations.

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    खासगी बस वाहतूकदारांची सरकारला नोटीसगांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) : राज्यातील खासगी बस व्यावसायिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या सात दिवसांत सोडवाव्यात; अन्यथा गोव्यात येणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना…

    You Missed

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    कारापूरवासीयांची सुटका करा

    कारापूरवासीयांची सुटका करा

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार