सर्वण कोमुनिदादकडून जमिनी विक्रीप्रकरणी स्पष्टीकरण; बेकायदेशीर व्यवहाराचा इन्कार

डिचोली, दि. ९: सर्वण गावातील कोमुनिदाद जमिनींच्या कथित बेकायदेशीर विक्रीप्रकरणी निर्माण झालेल्या चर्चेनंतर सर्वण कोमुनिदाद प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण जारी करत अशा व्यवहारांचा ठाम इन्कार केला आहे. काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे ग्रामस्थ आणि कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचे कोमुनिदादने म्हटले आहे.

कोमुनिदादचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर कु. सावंत यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने संबंधित बातम्या खोट्या असल्याचा दावा केला आहे. कोमुनिदादकडे कोणत्याही बेकायदेशीर जमीन विक्रीची नोंद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामस्थांमध्ये कोमुनिदादच्या जमिनी विश्वासात न घेता विकण्यात आल्याची चर्चा पसरली असली, तरी बातम्यांमध्ये उल्लेख केलेल्या जमिनींचा ताबा कोमुनिदादकडे नसून त्या जमिनी नागरिक कुळांकडे (टेनंट) असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

या कथित घोटाळ्याबाबत कोणाकडेही कागदोपत्री पुरावे असल्यास ते कोमुनिदाद प्रशासनाकडे सादर करावेत. संबंधित पुरावे तपासून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

तसेच ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर भरोसा ठेवावा, असे आवाहन कोमुनिदाद प्रशासनाने केले आहे. या स्पष्टीकरणानंतर ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील तणाव कमी होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

सर्वण गावाच्या हितासाठी कोमुनिदादचे पदाधिकारी कटिबद्ध असून कोणत्याही बेकायदेशीर कामांना समर्थन दिले जाणार नाही, असा पुनरुच्चारही प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आला आहे.

  • Related Posts

    काँग्रेस- आरजीपी युतीची दमदार पावले

    किमान समान कार्यक्रमावर भर गांवकारी,दि.२८(प्रतिनिधी) काँग्रेस आणि आरजीपी पक्षाच्या युतीसंबंधीची दुसरी महत्वाची बैठक आज पार पडली. किमान समान कार्यक्रमावर आजच्या बैठकीत दीर्घ चर्चा करण्यात आली. जागा वाटप किंवा अन्य गोष्टींबाबत…

    कारापूर : कामबंद नोटिशीला आव्हान

    ३० सप्टेंबर रोजी पंचायत संचालनालयात सुनावणी गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) कारापूर येथे प्रस्तावित ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’च्या प्रकल्पाला कारापूर-सर्वण पंचायतीने बजावलेल्या कामबंद नोटिशीला कंपनीने अतिरिक्त पंचायत संचालकांकडे आव्हान दिले आहे.…

    You Missed

    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप

    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप

    28/09/2026 e-paper

    28/09/2026 e-paper

    काँग्रेस- आरजीपी युतीची दमदार पावले

    काँग्रेस- आरजीपी युतीची दमदार पावले

    इन्कलाब झिंदाबाद !

    इन्कलाब झिंदाबाद !

    कारापूर : कामबंद नोटिशीला आव्हान

    SIR Citizens’ Monitor Calls ECI Response an ‘Eye-Wash’, Demands Reopening or Scrapping of SIR in Goa

    SIR Citizens’ Monitor Calls ECI Response an ‘Eye-Wash’, Demands Reopening or Scrapping of SIR in Goa