लघु दुरुस्तीच्या नावाखाली भ्रष्टाचार

जलस्त्रोत खात्यात राजकारणी, कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे साटेलोटे

गांवकारी, दि.११ (प्रतिनिधी)

जलस्त्रोत खात्यात दरवर्षी लघु दुरुस्तीच्या नावाने शेकडो निविदा जारी करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या निविदा राजकीय संबंध असलेल्या कंत्राटदारांना दिल्या जात असून त्यात राजकारणी, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची एक साखळी कार्यरत असल्याचे उघड झाले आहे.
अलिकडेच पेडणे तालुक्यातील मांद्रे मतदारसंघातील तुये येथे शेतीचे नाले साफ करण्यासाठी निविदा जारी करण्यात आली होती. ही कामे अर्धवट ठेवून पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यात आले आणि त्यानंतर संपूर्ण रक्कम कंत्राटदाराला अदा करण्यात आली. या प्रकरणानंतर मांद्रे व पेडणे मतदारसंघात अशा शेकडो कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी हडप झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तुये नागरिक कृती समितीने या प्रकरणाबाबत दक्षता संचालकांकडे तक्रार दाखल केली आहे. समितीचे अध्यक्ष सत्यवान वराडकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत मिरांडा शेत, बाबुचे शेत तसेच पानकर म्हादळो येथील खाजन शेतीचे चोळ साफ करण्याची कामे नमूद केली आहेत. अनुक्रमे १४.९३ लाख व १४.८५ लाख किंमतीची ही कामे मेसर्स गोल्डन ब्रिक्स वर्क्स स्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला देण्यात आली होती. तक्रारीनुसार, कामे पूर्ण न करताच अधिकाऱ्यांनी पूर्णत्व प्रमाणपत्रे जारी करून ठेकेदाराला संपूर्ण रक्कम अदा केली.
‘मायनर रिपेअर्स’ ही योजना काही राजकीय प्रभाव असलेल्या ठेकेदारांसाठी सरकारी पैसा लुटण्याचे साधन बनली असल्याचा गंभीर आरोप समितीने केला आहे. किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची कामे मंजूर केली जातात, परंतु प्रत्यक्षात ती होत नाहीत किंवा अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जातात. त्यानंतर अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने पूर्णत्व प्रमाणपत्रे देऊन संपूर्ण रक्कम काढली जाते.
कंत्राटदार कंपनीत माजी मंत्र्यांची सून
तुयेतील हे कंत्राट मिळालेल्या कंपनीची संचालक ही एका माजी मंत्र्यांची सून असल्याची माहिती समोर आली आहे. ही कंपनी पूर्वी माजी मंत्र्यांच्या मुलाच्या नावे होती. तिथे आता त्याने आपल्या बायकोची वर्णी लावली आहे. या कंपनीच्या नावे जलस्त्रोत खात्यातील एक शिपाईच ही कामे करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या शिपायाने आपले राजकीय वजन वापरून आपली नेमणूक एका आमदाराच्या कार्यालयात केल्याचीही चर्चा सुरू आहे.

  • Related Posts

    फोंड्यात धमक्या, कमिशनबाजीला ऊत

    मगोचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकरांचा हल्लाबोलगांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने मतदारसंघनिहाय सर्वेक्षणाच्या माध्यमातून जनमताची चाचपणी सुरू केली…

    Complaint Accuses Goa Minister Vishwajit Rane, Deviya Rane of Fraud in Karapur Land Mutation

    A serious complaint alleging fraudulent mutation and illegal transfer of ancestral properties at Karapur has been lodged against Goa Minister Vishwajit Rane and Deviya Vishwajit Rane by Vishwasrao L. Rane, who claims to be a co-owner of the properties.

    You Missed

    25/08/2026 e-paper

    25/08/2026 e-paper

    फोंड्यात धमक्या, कमिशनबाजीला ऊत

    फोंड्यात धमक्या, कमिशनबाजीला ऊत

    मगोची साथ, भाजपची डोकेदुखी ?

    मगोची साथ, भाजपची डोकेदुखी ?

    Complaint Accuses Goa Minister Vishwajit Rane, Deviya Rane of Fraud in Karapur Land Mutation

    Complaint Accuses Goa Minister Vishwajit Rane, Deviya Rane of Fraud in Karapur Land Mutation

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper