चला दोस्त हो, भवितव्यावर ‘बोलू काही’ !

न्या. फेर्दिन रिबेलो यांचे २ ऑक्टोबर रोजी ‘युथ कनेक्ट’

गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी)

गोव्याचे भवितव्य घडविण्यात युवा पिढीची भूमिका नेमकी काय असावी? राज्यातील सध्याच्या परिस्थितीकडे युवक कसे पाहतात? त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि कल्पना काय आहेत? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे युवकांना भविष्यात नेमका कसा गोवा हवा आहे? या प्रश्नांवर खुलेपणाने ‘बोलू काही…’ म्हणत ‘इनफ इज इनफ, गोवा’तर्फे ‘युथ कनेक्ट’ या खुल्या आणि संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता मडगाव येथील ग्रेस चर्च हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार असून, ताहीर नोरोन्हा आणि सोहेल फुर्तादो यांनी आयोजित केेेलेल्या या कार्यक्रमात ‘इनफ इज इनफ, गोवा’चे निमंत्रक तथा निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो बीजभाषण करणार आहेत.

गोवा वाचवायचा असेल तर युवा पिढीने आता पुढाकार घेण्याची गरज आहे. गोव्याचा युवक जागा झाला आणि राज्याच्या भवितव्याबाबत सक्रिय झाला, तरच गोवा भावी पिढ्यांसाठी जपला जाऊ शकतो. अन्यथा आपल्याच भूमीत गोव्याचा युवक आश्रित बनण्याचा धोका आहे, अशी चिंता न्या. रिबेलो यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर युवकांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘युथ कनेक्ट’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

‘युवकांसाठी एक जागा, त्यांच्या आवाजासाठी एक व्यासपीठ’ या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. गोव्यातील युवकांना आपल्या परिसरातील तसेच राज्यासमोरील विविध प्रश्नांवर निर्भीडपणे बोलण्याची संधी या व्यासपीठावर मिळणार आहे. युवक स्वतः करीत असलेल्या सामाजिक किंवा अन्य उपक्रमांची माहिती देऊ शकतील. त्याचबरोबर नव्या कल्पना, अपेक्षा आणि भविष्यातील गोव्याबाबतचे आपले विचारही मांडू शकतील.

विशेषतः गोव्याच्या सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीकडे युवा पिढी कशी पाहते, रोजगार आणि भवितव्याबाबत तिच्या अपेक्षा काय आहेत, तसेच गोव्याच्या विकासाची दिशा कशी असावी, यावर या संवादात चर्चा होणार आहे.

युवा पिढीचा आवाज केवळ ऐकून घेण्यापुरता मर्यादित न राहता त्यांना आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

आयोजकांनी पालक आणि ज्येष्ठ नागरिकांनाही आपल्या कुटुंबातील युवकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे. “युवकांना बोलू द्या; त्यांचा आवाज ऐकला जाऊ द्या,” असा संदेश आयोजकांनी दिला आहे.

युवकांनी कोणताही संकोच न बाळगता पुढे यावे, आपले प्रश्न विचारावेत, विचार आणि कल्पना मांडाव्यात आणि ‘युथ कनेक्ट’ हे आपले स्वतःचे व्यासपीठ बनवावे, असे आवाहन ‘इनफ इज इनफ, गोवा’तर्फे करण्यात आले आहे.

  • Related Posts

    Carrying Capacity Study Pending, Yet Tuem Panchayat Clears Houses With Swimming Pools

    The Village Panchayat of Tuem has come under scrutiny after approving construction licences for residential projects with swimming pools, despite objections that the village’s carrying capacity had not yet been assessed.

    Let the Youth Speak: ‘Youth Connect’ to Discuss Goa’s Future

    Enough is Enough, Goa will organise ‘Youth Connect’, an open and interactive session for young Goans to share their concerns, ideas and aspirations for the State on October 2. Retired Justice Ferdino Rebello will deliver the keynote address, emphasising greater youth participation in issues concerning Goa.

    You Missed

    Carrying Capacity Study Pending, Yet Tuem Panchayat Clears Houses With Swimming Pools

    Carrying Capacity Study Pending, Yet Tuem Panchayat Clears Houses With Swimming Pools

    29/09/2026 e-paper

    29/09/2026 e-paper

    जमीन हडप; जाळे किती खोल ?

    जमीन हडप; जाळे किती खोल ?

    चला दोस्त हो, भवितव्यावर ‘बोलू काही’ !

    चला दोस्त हो, भवितव्यावर ‘बोलू काही’ !

    Let the Youth Speak: ‘Youth Connect’ to Discuss Goa’s Future

    Let the Youth Speak: ‘Youth Connect’ to Discuss Goa’s Future

    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप

    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप