रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

अनधिकृत बांधकामप्रकरणी पुढील सुनावणी २८ ऑक्टोबर रोजी
गांवकारी,दि. ३० (प्रतिनिधी)

क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्या कथित अनधिकृत बांधकामाच्या नियमितीकरणाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दखल घेतली आहे. याचिकाकर्ते काशिनाथ शेट्ये व इतरांनी दाखल केलेल्या या प्रकरणात न्यायालयाने तवडकर यांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

याचिकेत तवडकर यांच्याशी संबंधित कथित अनधिकृत बांधकाम आणि त्यांच्या नियमितीकरणाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. संबंधित नियमितीकरण कायदेशीर तरतुदींनुसार झाले आहे का आणि त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पाळण्यात आली का, याची न्यायालयीन छाननी व्हावी, अशी याचिकाकर्त्यांची भूमिका आहे.

गोव्यात अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाचा मुद्दा सध्या विशेष चर्चेत आहे. यासाठी राज्य सरकारने विशेष कायदा, २०१६ मध्ये तयार केला आहे. या व्यतिरीक्त माझे घर योजनेअंतर्गत सरकारकडून वेगवेगळ्या बांधकामांच्या नियमितीकरणाला चालना दिली आहे.

दरम्यान, काशिनाथ शेट्ये यांनी यापूर्वीही अनधिकृत बांधकामे, सीआरझेड उल्लंघन आणि जमीनविषयक प्रश्नांवर विविध न्यायालयीन लढे दिले आहेत. अलीकडेच त्यांच्या अन्य एका प्रकरणात उच्च न्यायालयाने एनजीटीचा आदेश रद्द करून प्रकरण नव्याने विचारात घेण्याचे निर्देश दिले होते.

आता २८ ऑक्टोबरच्या सुनावणीकडे लक्ष लागले असून तवडकर यांच्याकडून न्यायालयात काय भूमिका मांडली जाते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • Related Posts

    तुये कन्व्हेन्शन सेंटरला तीव्र विरोध

    भरपाई, रोजगार आणि जमीन हक्कांबाबत जमीन मालकांचा जाब गांवकारी,दि.१(प्रतिनिधी) इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) उभारण्यासाठी जमिनी घेताना स्थानिकांना दाखवलेली विकास आणि रोजगाराची स्वप्ने नेमकी कुठे गेली, असा सवाल उपस्थित करत तुयेतील…

    Sachin Pilot to Join Goy Rakhonn Yatra in Sakhlim on Gandhi Jayanti

    AICC General Secretary and Punjab in-charge Sachin Pilot will join the Congress party’s ongoing Goy Rakhonn Yatra in the Sakhlim (Sanquelim) constituency on October 2 as part of a special Gandhi Jayanti programme. Pilot will walk with the Yatris to highlight issues concerning Goa’s land, environment, employment, heritage, governance and identity.

    You Missed

    01/10/2026 e-paper

    01/10/2026 e-paper

    कंत्राटी शिक्षकांना न्याय द्या

    कंत्राटी शिक्षकांना न्याय द्या

    तुये कन्व्हेन्शन सेंटरला तीव्र विरोध

    तुये कन्व्हेन्शन सेंटरला तीव्र विरोध

    Sachin Pilot to Join Goy Rakhonn Yatra in Sakhlim on Gandhi Jayanti

    Sachin Pilot to Join Goy Rakhonn Yatra in Sakhlim on Gandhi Jayanti

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    30/09/2026 e-paper

    30/09/2026 e-paper