राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

रमेश तवडकर यांना पूर्ण विश्वास

गांवकारी,दि.३०(प्रतिनिधी)

राज्यातील अनुसुचित जमातीला राजकीय आरक्षणाच्या विषयावर आपण केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी उपेंद्र जोशी यांच्यामार्फत या गोष्टीकडे आपण जातीने लक्ष ठेवून आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण मिळणार, याबाबत अजिबात दुमत नाही,असा विश्वास क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी बोलून दाखवला.
आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारांनी त्यांना या गोष्टीवर विचारले. राजकीय आरक्षणाचा विषय अचानक थंड कसा काय पडला. राजकीय आरक्षणाचे भवितव्य काय,असे विचारले असता राजकीय आरक्षणाच्या विषयावर आपण केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. दर दोन दिवसांनी या प्रक्रियेची माहिती घेत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपेंद्र जोशी यांची मदत घेण्याचे निर्देश आपल्याला दिले आहेत. त्यांच्यामार्फत आपण राजकीय आरक्षणाचा पाठपुरावा करत असल्याचेही रमेश तवडकर म्हणाले. राजकीय आरक्षण हा अनुसुचित जमातीचा घटनात्मक अधिकार आहे. तो अधिकार प्राप्त करण्यात कुणाचाही आक्षेप असण्याची गरज नाही,असेही ते म्हणाले.

  • Related Posts

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    अनधिकृत बांधकामप्रकरणी पुढील सुनावणी २८ ऑक्टोबर रोजीगांवकारी,दि. ३० (प्रतिनिधी) क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्या कथित अनधिकृत बांधकामाच्या नियमितीकरणाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दखल घेतली आहे. याचिकाकर्ते…

    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain

    Barcelona, 30 September 2026 : Goan squash player Yash Fadte continued his impressive run on the professional circuit by winning the PSA Copa Federació 2026 at Sant Andreu, Barcelona, defeating top-seeded Ignacio Fajardo of Spain in straight games in the final.

    You Missed

    30/09/2026 e-paper

    30/09/2026 e-paper

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain

    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain

    Carrying Capacity Study Pending, Yet Tuem Panchayat Clears Houses With Swimming Pools

    Carrying Capacity Study Pending, Yet Tuem Panchayat Clears Houses With Swimming Pools