उमेदवारीवरून भाजपात अस्वस्थता !

बी. एल. संतोष यांच्या आढावा बैठकीत सखोल चर्चा; जनसंपर्क आणि पक्षनिष्ठेलाच प्राधान्य देण्याचे संकेत

गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी उमेदवारीबाबत दिलेल्या स्पष्ट संकेतांमुळे पक्षाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे वृत्त आहे. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, संघटनाशी निष्ठा राखणाऱ्या आणि जनतेशी सातत्याने संपर्कात राहणाऱ्यांनाच उमेदवारीत प्राधान्य दिले जाईल, असे संकेत त्यांनी दिल्याने विद्यमान आमदारांची उमेदवारी निश्चित नसल्याची चर्चा पक्षांतर्गत सुरू झाली आहे.

चिंबल येथील भाजपच्या नव्या मुख्यालयात बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत आमदारांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे संघटनमंत्री शिवप्रकाश, गोवा प्रभारी भारती पवार, सहप्रभारी अनिल अँटनी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह पक्षाचे आमदार उपस्थित होते. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात आणि सांताक्रुझचे आमदार रुदोल्फ फर्नांडिस विदेशात असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

बैठकीत प्रत्येक मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, पक्षसंघटनेची ताकद, आमदारांचा जनसंपर्क आणि आगामी निवडणुकीच्या तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला. काही मतदारसंघांत पक्षांतर्गत इच्छुकांकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याचा मुद्दाही चर्चेला आला. अशा इच्छुकांना पाठबळ देऊन पक्षांतर्गत गटबाजीला प्रोत्साहन देऊ नये, अशा स्पष्ट सूचना संतोष यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे.

विशेष म्हणजे, पुढील तीन महिन्यांत जनतेशी संपर्क वाढविण्यासाठी प्रत्येक आमदाराने कोणती ठोस योजना आखली आहे, याचीही संतोष यांनी विचारणा केली. केवळ आमदार असल्यामुळे उमेदवारी मिळेल, असे गृहीत धरू नये, असा अप्रत्यक्ष संदेश या बैठकीतून देण्यात आल्याची चर्चा आहे.

योजनांच्या लाभातून मते मिळत नाहीत!

बैठकीत सरकारी नोकऱ्या, कल्याणकारी योजना आणि त्यांचा जनतेवर होणारा परिणाम यावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी गृहआधार योजनेच्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी केली. मात्र, सामाजिक योजनांच्या लाभातून अपेक्षित राजकीय पाठिंबा किंवा मते मिळतातच असे नाही. त्यामुळे केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून योजनांच्या रकमेत वाढ करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संतोष यांनी मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारने केलेली विकासकामे, राबविलेल्या योजना आणि विविध उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा सल्लाही त्यांनी आमदारांना दिला. मतदारसंघात प्रत्यक्ष काम आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

  • Related Posts

    Congress Condemns Alleged Police Manhandling of Woman Protester at Azad Maidan

    Demands impartial inquiry into police action; questions legality of detentions in absence of prohibitory orders

    Congress Condemns Alleged Police Manhandling of Woman Protester at Azad Maidan

    The Goa Pradesh Congress Committee (GPCC) has strongly condemned the alleged manhandling of a young woman protester during Sunday’s demonstration at Azad Maidan, Panaji, and demanded an impartial investigation into the police action and the authority under which protesters were detained.

    You Missed

    Congress Condemns Alleged Police Manhandling of Woman Protester at Azad Maidan

    Congress Condemns Alleged Police Manhandling of Woman Protester at Azad Maidan

    Congress Condemns Alleged Police Manhandling of Woman Protester at Azad Maidan

    Congress Condemns Alleged Police Manhandling of Woman Protester at Azad Maidan

    पत्रकार साईप्रसाद कुबडे यांच्यावरील हल्ल्याची गंभीर दखल घ्या!

    पत्रकार साईप्रसाद कुबडे यांच्यावरील हल्ल्याची गंभीर दखल घ्या!

    उमेदवारीवरून भाजपात अस्वस्थता !

    उमेदवारीवरून भाजपात अस्वस्थता !

    12/10/2026 e-paper

    12/10/2026 e-paper

    जमिनीचा लढा भरकटवू नका !

    जमिनीचा लढा भरकटवू नका !