‘बस्स झाले, आता पुरे करा…’

एक पोलिस, निर्लज्जपणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे त्याच्याकडे बघत असतानाही एका कुख्यात गुन्हेगाराला तुरुंगातून बाहेर काढतो… म्हणजे ही काय एस्कॉर्ट सर्व्हिस आहे!
त्यात एका प्रतिष्ठित राजकीय पक्षाचा नेता, पेशाने वकील, वर नमूद केलेल्या फरार गुन्हेगाराचा ठावठिकाणा पोलिसांना कळवण्याऐवजी, जे कुणीही सुजाण नागरिक करेल, ते सोडून त्याने पाठवलेला एक व्हिडिओ व्हायरल करतो.
मग या सगळ्या घडामोडीतून एक राजकीय वादळ उठते. आप पक्षाला गुन्हेगाराचा ठावठिकाणा माहित असूनही आमचे आमचे भ्रष्ट, तडजोड करणारे पोलिस त्याचा माग लावू शकत नाहीत.
हे सगळे कमी म्हणून की काय, उपसभापती, ज्यांच्या शाही लग्न सोहळ्याच्या पूर्वसंध्येला, तो गुन्हेगार त्यांच्यावर बेनामी व्यवहारांचा आरोप करतो. पण उपसभापती, ते ठरले सत्ताधारी भाजपचे नेते, म्हटल्यावर त्यांच्यावरचे सगळे डाग पुसून काढून त्यांना चकाकी देण्यासाठी भाजपचे वॉशिंग मशीन कार्यान्वित होणे स्वाभाविकच होते.
आणि त्यात आमचे मित्र एड. यतीश नायक, हे केस्टो मुखर्जीसारखे, हा सगळा प्रकार आम्हाला समजून देण्याचा खटाटोप करतात.
आमच्या डोळ्यांसमोर हे सगळे विचित्र नाटक घडत असताना आम्ही मात्र मोठ्या आनंदाने व्हॉट्सॲप मेसेज फॉरवर्ड करतो आहोत. या घटनांवर आधारित चित्रपटगृहांमध्ये पुष्पा-३ प्रदर्शित झाल्यागत त्यावर आपले सामाजिक भाष्य करत.
आम्ही पोकळ, त्यात आमची पोकळ माध्यमे या पोकळ सरकारच्या खोल दरीत गटांगळ्या खात आहोत.
या मुजोर सत्ताधारी विदूषकांच्या सभोवताली आम्ही कॉरिडिन्हो (पोर्तुगीज नृत्य) किंवा देखणी नृत्य करण्यात इतके व्यस्त आहोत की, मिळेल कसा तरी न्याय मिळेल ही व्यर्थ आशा बाळगून आहोत. ( तसे आम्ही गोमंतकीय स्वतःच्या मोठेपणात आणि एटीत मश्गूल असतोच म्हणा )
सध्या एक आणि फक्त एकच मुद्दा गोव्याला बहुमुखी राक्षसासारखा भेडसावतो आहे.
काहीही केले तरी आपले कुणी वाकडे करू शकणार नाही तसेच कुणाची काहीच फिकीर करायची गरज नाही, ही मनोवृत्ती सत्ताधाऱ्यांची बनली आहे. या लोकांनी टोळ धाडी घातल्यागत जमीनी बळकावण्याचे सत्र आरंभले आहे. ही कला त्यांच्या इतक्या अंगवळणी पडली आहे की इंग्रज, पोर्तुगीज किंवा मुगलांनाही त्यांचा हेवा वाटावा.
त्या बिचाऱ्या आक्रमकांना जमीन बळकावण्यासाठी युद्ध पुकारून आपली कितीतरी माणसे आणि संपत्ती गमवावी लागली होती.
आत्ताचे आमचे सत्ताधारी हे सगळे काम फक्त पेनाच्या जोरावर करत आहेत. जमीन मालकीचे बनावट दस्तएवज, सरकारी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा सर्रासपणे वापर करून.
खरे सांगायचे तर, झिओनिस्टांनी इथे येऊन रक्तपात न करता जमीन कशी बळकावायची हे शिकायलाच हवे.
ही परिस्थिती गंभीर रूप धारण करत आहे आणि त्यामुळे माझा मुडच खराब झाला आहे. मी अलिकडेच कोलकात्यात असताना तिथे माझ्या हातात एका मॉलमध्ये गोव्याच्या जमीन विक्रीचे एक जाहीरात पत्रक हातात दिले गेले. मी इतका संतापलो की तिथल्या सांताक्लॉजलाच रागाने ठोसा लगावला.
आता या संकटातून बाहेर पडायचे झाले तर फक्त दोनच संभाव्य उपायांची कल्पना करता येईल.
न्यायपालिका ही सगळी सुत्रे आपल्या हातात घेते. सर्व काही: रेकॉर्ड, तपास अहवाल, बनावटगिरीचे पुरावे सगळे काही न्यायपालिकेच्या हातात.
सगळा तपास आणि तपासाची सुत्रे न्यायपालिकाच हाताळणार.
आपल्या मातृभूमीच्या बलात्काऱ्यांचा ( गोव्यावर चाललेले अनन्वीत अत्याचार आणि जमिनींचे सौदे यांना यापेक्षा वेगळा पर्यायी शब्द असू शकेल तर निश्चितच सूचवा ) कालबद्ध तपास होऊन त्यांना तुरूंगवास होऊन या प्रकरणांचा शेवट होईपर्यंत.
जसे म्हणतात ना, “कठीण प्रसंगी कठोर उपाययोजना कराव्या लागतात`. माझी विचारधारा या पक्षाच्या विचारधारेशी वेगळी असली तरी, गोव्यात भाजपचे नेतृत्व करण्यासाठी एखादा ज्येष्ठ, विश्वासार्ह नेता मिळावा, असे वाटते. जेणेकरून निदान काही प्रमाणात तरी राज्याच्या भळभळत्या जखमांवर मलमपट्टी करता येईल. “औजियाच्या तबेल्याची सफाई करणे हे एक कठीण काम आहे.” असे म्हणतात. होय, ती व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची असू शकते, पण जुन्या काळी म्हणत त्याप्रमाणे ती प्रामाणिक आणि प्रामाणिकता हीच त्याची ओळख असावी. या ठगांसारखी नाही, जे आम्ही डोळे बंद करून आहोत हे पाहील्यानंतर निरर्थकतेकडे ओढून नेत आहेत. गोव्याच्या इतिहासात हे सर्वात क्रूर आणि लज्जास्पद सरकार आहे यात अजिबात शंका नाही. आपल्याला फक्त ताबडतोब ह्यात दुरूस्ती करावी लागणार आहे. किमान काही काळासाठी का होईना, पण गोव्यावरचा हा थरारक प्रयोग बंद व्हायलाच हवा. आणि त्यासाठी तुम्ही सर्व भाजपचे हीतचिंतक आणि समर्थक, ज्यांची हीच भावना बनली आहे (आणि मला खात्री आहे की तुमच्यातील लाखोंची ही भावना आहे), तुम्हाला ती मूकपणे का होईना, पण सांगावी लागणारच आहे. बस्स, आता पुरे झाले`…

डॉ. ऑस्कर रेबेलो
पणजी- गोवा

  • Related Posts

    परशुराम कोटकर यांचे निधन

    पक्षनिष्ठेचा आदर्श हरवला पेडणे,दि.१७(प्रतिनिधी) गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांचे निस्सीम भक्त, मगोचे ज्येष्ठ नेते तथा पेडणेचे माजी आमदार परशुराम कोटकर यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकारणातील पक्षनिष्ठेचा एक…

    बदनामीवर प्रामाणिकतेचा इलाज

    हे ड्रग्स गोव्याची प्रतिमा धुण्यासाठी भाजपच्या वॉशींग मशीनमध्ये डिटर्जंट म्हणून वापरणार होते काय, याचे उत्तर सरकारला द्यावे लागणार आहे. गोव्याच्या पर्यटनाची नियोजनबद्ध बदनामी सुरू आहे. काही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    18/01/2025 e-paper

    18/01/2025 e-paper

    सूर्याचे लग्न !

    सूर्याचे लग्न !

    दामू नाईक व्हा पुढे…

    दामू नाईक व्हा पुढे…

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष दामू कार्यकर्तृत्व महती त्याची काय वानू..!!

    नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष दामू कार्यकर्तृत्व महती त्याची काय वानू..!!

    ‘गांव जाला जाण्टो’ आता मुंबईत

    ‘गांव जाला जाण्टो’ आता मुंबईत
    error: Content is protected !!