बेतोडा जमीन घोटाळ्याचा सूत्रधार कोण?

फोंडा नगर नियोजन खात्याचे कर्मचारी रडारवर

गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी)

फोंडा तालुक्यातील बेतोडा गावात उघडकीस आलेल्या मोठ्या जमीन घोटाळ्याचा तपास योग्य पद्धतीने व्हायला हवा. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारांना शासन होणे आवश्यक आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारांना संरक्षण देण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा इशारा गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुहम्मद जावेद मुल्ला आणि नीरज मधु काणकोणकर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नगर नियोजन खात्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करून खोट्या मालकीच्या दस्तऐवजांचा वापर करून विक्रीखत तयार केल्याची टीका करण्यात आली आहे. हे सर्व सूत्रधार सध्या जामिनावर असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
फोंडा पोलिसांनी या प्रकरणात फर्दिन शेख (४०), फोंडा नगरपालिकेजवळील रहिवासी, याला अटक केली असून तो या व्यवहारातील दलाल असल्याचे समोर आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेल्या बेकायदेशीर जमीन व्यवहारांच्या चौकशीत ही अटक झाली आहे. याशिवाय नगर नियोजन खात्यातील अन्य दोन कर्मचाऱ्यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली आहे.
फोंडा पोलिसांनी उपनगर नियोजक मांगिरीश वेर्णेकर यांची चौकशी केली असून त्यांनी अटकेची शक्यता ओळखून जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या सह्या असलेली ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ बहाल करण्यात आली आहेत. मात्र, ही सही आपली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे ५५,७०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या मालमत्तेशी संबंधित हे प्रकरण असून, ३३ सहमालकांनी दिलेल्या ‘पॉवर ऑफ अटर्नी’चा गैरवापर केल्याचा आरोप आहे. नगर नियोजन विभागाकडून जारी केल्याचे भासवून बनावट ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ वापरून बेतोडा कोमुनिदादची वारसाहक्काची व अविभाजित मालमत्ता बेकायदेशीररित्या विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे.
चौकशीदरम्यान, फोंडा उपनिबंधक कार्यालयातून सुमारे ५० मूळ विक्रीखत जप्त करण्यात आले असून ती बनावट ‘ना हरकत’च्या आधारे नोंदणी करण्यात आल्याचा संशय आहे.
या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४६५, ४६७, ४६८ (बनावट कागदपत्रे तयार करणे), ४७१ (बनावट कागदपत्रांचा वापर) तसेच कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक रहिवासी उच्चारी गवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या फसवणुकीमुळे त्यांना त्यांच्या कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

  • Related Posts

    राज्यात गुन्हेगारीचा कहर

    काँग्रेसतर्फे राज्यपालांना निवेदन सादर गांवकारी,दि.२ (प्रतिनिधी) गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे बुधवारी राज्यपाल पी.एस.अशोक गजपती राजू यांची भेट घेऊन राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर निवेदन सादर करत तातडीने घटनात्मक हस्तक्षेप…

    चेकपोस्टच्या पोस्टिंगसाठी लाखोंच्या बोली ?

    आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांचा हल्लाबोल गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) राज्यातील वेगवेगळ्या सीमांवर वाहतूक खात्यातर्फे उभारण्यात आलेल्या आरटीओ चेकपोस्टवर पोस्टिंग मिळवण्यासाठी दर सहा महिन्यांनी लाखो रुपयांच्या बोली लावल्या जातात. सर्वाधिक…

    You Missed

    वकिलावरील हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेलाच आव्हान; ‘ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन कायदा’ लागू करा : काँग्रेस

    वकिलावरील हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेलाच आव्हान; ‘ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन कायदा’ लागू करा : काँग्रेस

    १५२ पेपरफुटींच्या आरोपींसाठी भाजप बनला आश्रयस्थान; २५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार : गिरीश चोडणकर

    १५२ पेपरफुटींच्या आरोपींसाठी भाजप बनला आश्रयस्थान; २५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार : गिरीश चोडणकर

    डिचोलीत शैक्षणिक क्षेत्रात नवा विश्वविक्रम; आत्माराम गांवकर यांच्या १०३ पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन

    डिचोलीत शैक्षणिक क्षेत्रात नवा विश्वविक्रम; आत्माराम गांवकर यांच्या १०३ पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन

    CM Must Act Before It’s Too Late Over Karapur-Sarvan Protest: Girish Chodankar

    CM Must Act Before It’s Too Late Over Karapur-Sarvan Protest: Girish Chodankar

    Veteran Congress Leader Eduardo Faleiro Backs GPCC’s Fight to Protect Goa

    Veteran Congress Leader Eduardo Faleiro Backs GPCC’s Fight to Protect Goa

    भाटकार, वकीलावर मोरजीत प्राणघातक हल्ला

    भाटकार, वकीलावर मोरजीत प्राणघातक हल्ला