डेल्टीन कॅसिनोवरून सरकारचे वस्त्रहरण

‘इनफ इज इनफ’ चा सरकारला पहिला दणका


गांवकारी, दि.२२ (प्रतिनिधी)

मांडवी नदीत डेल्टीन कॅसिनोचे सर्वांत मोठे जहाज येणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडली होती. मात्र ‘इनफ इज इनफ’ या लोकचळवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी राज्याचे अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी या भूमिकेचा काहीच उल्लेख केला नसल्याने सरकारचे वस्त्रहरण झाले आहे.
‘इनफ इज इनफ’ लोकचळवळीने मांडवीतील डेल्टीन कंपनीच्या नव्या, सर्वांत लांब आणि मोठ्या जहाजाला विरोध करणारी जनहित याचिका दाखल केली आहे. स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई, उदय भेंब्रे, सुदीप ताम्हणकर आणि हरिष मडकईकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सुनावणी झाली असता राज्य सरकार सपशेल उघडे पडले.
याचिकादारांच्यावतीने अॅड. एस. मुरलीधर यांनी केलेल्या युक्तिवादात गोवा सार्वजनिक जुगार कायदा तसेच सरकारने जारी केलेल्या अधिसूचना आणि परिपत्रकांचा संदर्भ देत एवढ्या लांबीच्या जहाजाला मांडवीत परवानगी देणे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे दाखवून दिले. ७० प्रवाशांचे जुने जहाज बदलून त्याठिकाणी २ हजार प्रवाशांचे जहाज आणणे हे कायदे व नियमांना धरून नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला असला तरी सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवून हे जहाज मांडवीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे युक्तिवादातून स्पष्ट झाले.
मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कॅसिनोविरोधी आंदोलनावेळी हे जहाज मांडवीत येणार नाही, असे ठामपणे सांगितले होते. मात्र अॅडव्होकेट जनरल यांनी या विधानासंबंधी खंडपीठात चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे विधान खरे की खोटे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कंपनीच्या वकिलांनी जहाज बांधणी बंदरातून हे जहाज बाहेर पडल्याची माहिती दिली असता खंडपीठाने याला जोरदार आक्षेप घेतला. खंडपीठाने राज्य सरकार व डेल्टीन कंपनीला सविस्तर प्रतिज्ञापत्र शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली आहे.

  • Related Posts

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    Goa University is preparing for a leadership transition, and the selection of its 10th Vice-Chancellor is crucial. After five years marked by academic reforms and controversies, the new appointment will determine the university’s direction for years to come, requiring a leader who can restore trust, transparency, academic freedom, and institutional excellence.

    कंत्राटी कर्मचारी कायम, २ हजार नोकऱ्या

    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्वातंत्र्यदिनी मोठी घोषणा गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी अथवा अन्य स्वरूपात १० वर्षापासून दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री…

    You Missed

    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    Independence Day Hypocrisy: Mahila Congress Corners Goa Govt Over 3-Day Mandrem ‘Freedom Blast’

    Independence Day Hypocrisy: Mahila Congress Corners Goa Govt Over 3-Day Mandrem ‘Freedom Blast’

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    15/08/2026 e-paper

    15/08/2026 e-paper

    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???

    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???