हत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारकडून मिळवून देणार

राजन कोरगांवकर यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी)

पेडणे तालुक्यातील तांबोसे गावात हत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापैकी सुमारे ९ शेतकऱ्यांना मिशन फॉर लोकल, पेडणे यांच्यावतीने मदत करण्यात आली. सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल तयार करून तो कृषी खात्याच्या माध्यमातून सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. आपण स्वतः सरकारकडे पाठपुरावा करून ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राजन कोरगांवकर यांनी सांगितले.
ओंकार नावाचा हत्ती सध्या पेडणे तालुक्यातील काही गावांतील लोकांची झोप उडवत आहे. मोपा-तोर्से मार्गे हा हत्ती तांबोसे गावात पोहोचला. तेथे शेतीची नासधूस करून तो आता उगवे गावात ठाण मांडून आहे. उगवे गावातील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान सुरू आहे. सरकारकडे या हत्तीला पकडण्यासाठी किंवा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना नसणे हे खरेच दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया राजन कोरगांवकर यांनी दिली. हा हत्ती उन्मत्त होऊन लोकवस्तीत शिरला तर हाहाकार माजेल, असेही त्यांनी नमूद केले.
नुकसानीची पाहणी
मिशन फॉर लोकल यांच्यावतीने राजन कोरगांवकर यांनी तांबोसे गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. माडाचे कवठे, पोफळी, केळीची झाडे आडवी पाडण्यात आली आहेत. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ही नुकसान भरपाईतून भरून येणारी नाही. या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळणे गरजेचे आहेच, परंतु त्याचबरोबर हे सगळे पीक परत घ्यायचे झाल्यास शेतकऱ्यांना दुप्पट मेहनत करावी लागणार आहे. सरकारची शेतकऱ्यांप्रतीची संवेदनशीलता अपुरी आहे, अशी खंतही राजन कोरगांवकर यांनी व्यक्त केली.

  • Related Posts

    MLAs Cannot Control Behaviour of Pass Holders

    GFP MLA Vijay Sardesai responds to the notice of speaker in Assembly Panaji, 10 : Vijai Sardesai on Tuesday responded in the Goa Legislative Assembly after Speaker Dr. Ganesh Gaonkar…

    LoP condemns Govt’s move to denotify 3.33 lakh sq. mt Cada land for Casinos

    Panaji : Leader of Opposition Yuri Alemao on Wednesday strongly condemned the BJP Government’s decision to denotify 3.33 lakh sq. mt. of command area land under the Tillari Irrigation Project…

    You Missed

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    24/03/2026 e-paper

    24/03/2026 e-paper

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    भाजप महिला जागी हो !

    भाजप महिला जागी हो !

    23/03/2026 e-paper

    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…