इंदोरच्या युवकाचा संशयास्पद मृत्यू

हणजूण येथील घटनेमुळे एकच खळबळ


गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी)

हणजूण येथे शुक्रवारी रात्री उशिरा एका पार्टीदरम्यान २१ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत युवक हा इंदोर, मध्यप्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
हा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झाल्याची चर्चा सुरू असली तरी शवचिकित्सा अहवाल येईपर्यंत तसा दावा करणे अयोग्य ठरेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हा ड्रग्सचा विषय असेल तर त्याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी दिली आहे. शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनीही या घटनेचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी केली आहे.

खाजगी इस्पितळातून गोमेकॉत दाखल
पार्टी सुरू असताना अचानक तब्येत बिघडल्याने युवकाला तत्काळ खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार त्याला दोन ते तीन खाजगी इस्पितळांत हलविण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने खाजगी इस्पितळाकडून गोमेकॉत पाठविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र एका खाजगी इस्पितळाने त्याला दाखल करून तपासणी केली असता मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे.
ओझरातची पार्टी रद्द
वागातोर-ओझरांत येथे एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. ही पार्टी एका बेकायदेशीर हॉटेलात होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी ती बंद करण्याची तयारी केली होती. आयोजकांना याचा सुगावा लागल्यानंतर पार्टी रद्द करण्यात आली.
कॅप्टन विरियातो फर्नांडिस ड्रग्सवर बोलले
दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत गोव्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या समस्येचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. १ एप्रिल २०२६ रोजी सादर केलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले की, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो व गुप्तचर यंत्रणांच्या प्रयत्नांनंतरही मोठ्या प्रमाणात बंदी घातलेले ड्रग्स गोव्यात येत आहेत. किनारपट्टी भागात, शाळा-कॉलेजांच्या आसपास तसेच नाइट क्लब परिसरात ड्रग्स सहज उपलब्ध असल्याचा त्यांनी इशारा दिला. यामुळे युवक व समाजावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगत, केंद्र सरकारने तातडीने कठोर कारवाई करून ड्रग्सविरोधात मोहीम उभी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

वागातोर येथे गुड फ्रायडेच्या रात्री पार्टीचे आयोजन करून भाजपने ख्रिस्ती धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. या रात्री ख्रिस्ती धर्मियांच्या चर्चमध्ये प्रार्थना होत असतात आणि अशा वेळी किनारी भागांत पार्ट्यांना परवानगी देऊन सरकार नेमके काय करू पाहत आहे, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. राज्यातील किनारी भागांत ड्रग्सचा विळखा वाढत चालला आहे. वागातोर येथील ही पार्टी लोकांच्या विरोधामुळे अखेरच्या क्षणी रद्द करण्यात आली. वागातोरवासीयांचे त्यासाठी अभिनंदन करावे लागेल. हणजूण येथे एका युवकाच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी होण्याची गरज आहे, असेही पाटकर म्हणाले. सरकारचे प्रशासनावर काहीच नियंत्रण राहिलेले नाही. स्थानिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. विविध ठिकाणी पोलिस आणि प्रशासनाला सेट करून पार्ट्यांचे आयोजन केले जात असून यात मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा वापर होत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. गृह खाते नेमके काय करत आहे, असा सवालही अमित पाटकर यांनी उपस्थित केला.

  • Related Posts

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांचा गोमंतकीयांना संदेश गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोमंतकीयांसह देश-विदेशातील भारतीयांना शुभेच्छा देताना पर्यावरण संरक्षण, स्थानिक रोजगार, सामाजिक सलोखा…

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    म्हार्दोळ, दि. १३ (प्रतिनिधी) : गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या दीर्घ लढ्याने गुरुवारी माडदोळ येथे आयोजित ‘उटा महामेळाव्या’त पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुसळधार पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने एसटी समाजबांधव या महामेळाव्याला उपस्थित राहिले. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजासाठी चार मतदारसंघ आरक्षित झालेच पाहिजेत, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure