कला अकादमीच्या दुरूस्तीवर पुन्हा ५० कोटींचा खर्च?

गांवकारी,दि.९(प्रतिनिधी)

कला अकादमीच्या दुरूस्तीवर यापूर्वी कोट्यवधी रूपयांचा खर्च केल्यानंतर आता दुरूस्ती कामातील त्रृटी दूर करण्यासाठी पुन्हा एकदा सुमारे ५० कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सदस्य सचिव शंकर गांवकर यांनी दिली.
कला अकादमीतील दीनानाथ मंगेशकर सभागृह १ ऑगस्टपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात येणार आहे. दुरुस्तीची कामे किती कालावधीत पूर्ण होतील, हे तज्ज्ञ समितीच्या अंतिम अहवालानंतर निश्चित होणार असल्याची माहिती कला अकादमीचे सदस्य सचिव शंकर गावकर यांनी दिली.
तज्ज्ञ समितीने सादर केलेल्या अंतिम अहवालाच्या आधारे सभागृहातील आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत. यासाठी आयआयटी चेन्नईचे डॉ. पिल्लई यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तज्ज्ञांचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निधीला अंतिम मंजुरी दिली जाणार असल्याचे गावकर यांनी स्पष्ट केले.
सभागृहाच्या दुरुस्तीमध्ये ध्वनीव्यवस्था, रंगमंच, ध्वनिशास्त्र (अ‍ॅकौस्टिक्स) तसेच संरचनात्मक स्थैर्य या महत्त्वाच्या बाबींचा समावेश असेल. या प्रत्येक कामासाठी स्वतंत्र तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंतिम अहवालात सुचविण्यात आलेल्या त्रुटींची दुरुस्ती करून सभागृह अधिक सक्षम व आधुनिक स्वरूपात विकसित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • Related Posts

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    खासगी बस वाहतूकदारांची सरकारला नोटीसगांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) : राज्यातील खासगी बस व्यावसायिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या सात दिवसांत सोडवाव्यात; अन्यथा गोव्यात येणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना…

    Private Bus Owners Serve 7-Day Ultimatum to Goa Government, Threaten Black Flag Protest

    Goa’s private bus owners have issued a 7-day ultimatum to the government, demanding permits for KTC-hired electric buses and threatening a peaceful black flag protest. They claim the electric buses’ overlapping operations are harming their livelihoods.

    You Missed

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    कारापूरवासीयांची सुटका करा

    कारापूरवासीयांची सुटका करा

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    Private Bus Owners Serve 7-Day Ultimatum to Goa Government, Threaten Black Flag Protest

    Private Bus Owners Serve 7-Day Ultimatum to Goa Government, Threaten Black Flag Protest