कटमगाळ दादाला हात लावणार नाही

आयआयटी फर्मागुडीतच होणार : मुख्यमंत्री

गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी)

फर्मागुडीतील नियोजित आयआयटी प्रकल्पाबाबत दोन्ही स्थानिक आमदारांशी चर्चा झाली आहे. याव्यतिरिक्त या भागातील स्थानिकांशीही संवाद साधण्यात आला. याठिकाणी श्री कटमगाळ दादाच्या पवित्र स्थळाला अजिबात हात लावला जाणार नाही. या धार्मिक स्थळाचे पावित्र्य जपूनच याठिकाणी आयआयटीचे काम होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
फर्मागुडी येथील श्री कटमगाळ दादाचे स्थान आयआयटीमुळे धोक्यात येईल, या भीतीतून रविवारी शेकडो लोक एकवटले. विषय केवळ कटमगाळ दादाच्या स्थळाचा नाही. हा राखणदार असल्याने संपूर्ण जागा या देवाच्या अधिपत्याखाली येते. या परिसरात देवाचा संचार असतो आणि त्यामुळे या प्रकल्पामुळे देवाच्या पारंपरिक वाटा बंद होतील व त्याचे परिणाम स्थानिकांना भोगावे लागतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली. या जागेच्या मालकालाही याची प्रचिती आलेली आहे. सरकार कटमगाळ दादाच्या जागेकडे खेळ करून स्वतःसाठी संकट ओढवून घेत आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
फर्मागुडीचा पठार जलसंवर्धन स्त्रोत
फर्मागुडीचा पठार आणि विशेषतः श्री कटमगाळ दादाची ही जागा म्हणजे जलसंवर्धनाचा स्त्रोत आहे. या पठारावरच खालच्या शेतकऱ्यांचे मळे फुलतात. येथील शेती तसेच अन्य कृषी उत्पादनासाठी या पठाराचे जलस्त्रोतच उपयोगात येतात. हा पठार म्हणजे सभोवतालच्या गावांचा मोठा आधार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

  • Related Posts

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    रमेश तवडकर यांना पूर्ण विश्वास गांवकारी,दि.३०(प्रतिनिधी) राज्यातील अनुसुचित जमातीला राजकीय आरक्षणाच्या विषयावर आपण केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी उपेंद्र जोशी यांच्यामार्फत या गोष्टीकडे आपण जातीने लक्ष ठेवून…

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    अनधिकृत बांधकामप्रकरणी पुढील सुनावणी २८ ऑक्टोबर रोजीगांवकारी,दि. ३० (प्रतिनिधी) क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्या कथित अनधिकृत बांधकामाच्या नियमितीकरणाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दखल घेतली आहे. याचिकाकर्ते…

    You Missed

    30/09/2026 e-paper

    30/09/2026 e-paper

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain

    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain

    Carrying Capacity Study Pending, Yet Tuem Panchayat Clears Houses With Swimming Pools

    Carrying Capacity Study Pending, Yet Tuem Panchayat Clears Houses With Swimming Pools