महाकाय कॅसिनो जहाज नकोच!

मंगळवारी पणजीत जागृती सभेचे आयोजन

गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी)

मांडवी नदीत सुमारे २ हजार लोकांना सामावून घेणारे महाकाय कॅसिनो जहाज कुठल्याही प्रकारे आणले जाऊ नये, यासाठी पणजीकरांत जागृती सुरू झाली आहे. या जागृतीला व्यापकता मिळवून देण्यासाठी कॅसिनोविरोधी चळवळीतील लोकांनी एक महत्त्वाची जागृती सभा बोलावली आहे. संध्याकाळी ५.३० वाजता इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात या सभेचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे.
सरकारकडून महसूल, रोजगार आणि व्यवसायसंधीचे कारण देऊन कॅसिनोंच्या समर्थनार्थ भूमिका घेतली जाते. मात्र, कॅसिनोंच्या वाढत्या संख्येमुळे मांडवी नदी प्रदूषित होत असून त्याचे गंभीर परिणाम नदीशेजारी राहणाऱ्या लोकांवर होणार आहेत. स्थानिक मच्छीमारांना धोका निर्माण होण्याबरोबरच कॅसिनोंमुळे पणजी परिसराची अवकळा होत आहे. रात्रीचा झगमगाट आणि गर्दी जरी दिसत असली तरी शहरात परप्रांतीय कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रात्रीच्या वेळी बेदरकार वाहनचालक, दारू पिऊन रस्त्यावर व फुटपाथवर झोपणारे लोक यांची संख्याही वाढत आहे.
पणजीतील वाढते मसाज पार्लर आणि स्पा हे वेश्या व्यवसायाला आमंत्रण देणारे ठरत आहेत. अलिकडेच एका अहवालातून अशा पार्लरमधून शेकडो महिलांची सुटका झाल्याचे उघड झाले आहे. हे चित्र असेच राहिले तर राजधानी पणजीची प्रतिष्ठा आणि सन्मान धुळीस मिळेल, अशी भीती ‘पोणजेकार अगेन्स्ट कॅसिनो’ यांनी व्यक्त केली आहे.
कॅसिनो नकोच
कॅसिनोमुळे रोजगार व व्यवसायसंधी पणजीकरांना किंवा गोंयकारांना मिळतात, हा दावा फक्त हवेतला आहे. याची ठोस आकडेवारी सरकारकडे उपलब्ध नाही. कॅसिनोंचे गंभीर सामाजिक व आर्थिक परिणाम स्थानिकांमध्ये दिसू लागले आहेत. लोक लाजेपोटी या गोष्टींचा उल्लेख करत नाहीत. पणजीकर गप्प आहेत म्हणजे त्यांनी या गोष्टींना होकार दिला आहे, असे अजिबात नाही. काही कारणांमुळे ते उघडपणे प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाहीत. मात्र, कॅसिनोविरोधी लोकचळवळ उभी राहिली तर पणजीकर निश्चितच पाठिंबा देतील, असा विश्वास माजी नगरसेवक मिनिन डिक्रुझ यांनी व्यक्त केला.
धार्मिक संस्थांकडे पाठींबा मागणार
चर्च संस्था तसेच विविध हिंदू धार्मिक संस्थांकडे कॅसिनोविरोधी चळवळीला पाठींबा देण्यासाठी विनंती करण्यात येणार असल्याची माहिती ‘पोणजेकार अगेन्स्ट कॅसिनो’ संघटनेने दिली आहे. कॅसिनोंचे सामाजिक परिणाम भयावह आहेत. फक्त २५० ग्राहकांच्या जहाजाचे रूपांतर २ हजार ग्राहकांच्या महाकाय जहाजात होत असेल तर परिस्थिती किती गंभीर होईल, याचा विचार करा. या गर्दीचा मोठा ताण पणजी शहरावर पडणार असून त्याचे परिणाम स्थानिकांना भोगावे लागतील. रात्रीच्या वेळी पोलिसांकडून कॅसिनोवाल्यांना मोकळे रान दिले जाते. कुणीही पहारा किंवा गस्तीसाठी नसते. हे जहाज राजधानीसाठी शाप ठरण्याची शक्यता असल्याने त्याला कुठल्याही प्रकारे प्रवेश देता कामा नये, अशी भूमिका सॅबिना मार्टीन्स यांनी घेतली आहे.

  • Related Posts

    प्रभू व्हायोलेटा; दिल्लीत खळबळ

    खासदार विरियातो फर्नांडिस यांचे पत्र गांवकारी,दि.३(प्रतिनिधी) दाबोळी मतदारसंघातील चिखली पंचायत क्षेत्रात प्रभू व्हायोलेटा या रहिवासी संकुलात बिल्डरच्या बेजबाबदारपणामुळे पाणी दूषीत होऊन सुमारे दोनशे लोकांना अतिसाराचा त्रास जाणवल्याचा विषय दिल्लीत पोहचला…

    South Goa MP Flags ‘Humanitarian Crisis’ at Chicalim Housing Complex Over Water Contamination

    Panaji / Chicalim: South Goa MP Captain Viriato Fernandes has written to the South Goa Collector raising serious concerns over what he termed a “major disaster” and humanitarian crisis at…

    You Missed

    03/04/2026 e-paper

    03/04/2026 e-paper

    राष्ट्रपतींचा मान राखा

    राष्ट्रपतींचा मान राखा

    प्रभू व्हायोलेटा; दिल्लीत खळबळ

    प्रभू व्हायोलेटा; दिल्लीत खळबळ

    South Goa MP Flags ‘Humanitarian Crisis’ at Chicalim Housing Complex Over Water Contamination

    South Goa MP Flags ‘Humanitarian Crisis’ at Chicalim Housing Complex Over Water Contamination

    02/04/2026 e-paper

    02/04/2026 e-paper

    महापौर रोहितचा बंगला हायकोर्टात

    महापौर रोहितचा बंगला हायकोर्टात