मेडिकल आणि नर्सिंग कॉलेजचे गाजर

तुये इस्पितळाचे दुसऱ्यांदा उद्घाटन



गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी)

पेडणेतील जनता तुये येथील इस्पितळ पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे, ही अपेक्षा बाळगून असतानाच आज या इस्पितळाच्या दुसऱ्या उद्घाटनप्रसंगी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ह्याच इस्पितळ परिसरात मेडिकल आणि नर्सिंग कॉलेज स्थापन करण्याचे आश्वासन दिले. केवळ जीएमसी संलग्न नव्हे, तर या इस्पितळाला जिल्हा इस्पितळाचा दर्जा देणार असल्याचे सांगून त्यांनी पेडणेकरांना खूष केले. आपले आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध खूप चांगले असल्याचे नमूद करताना, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना २०२७ मध्ये पुन्हा भाजप सरकार सत्तेवर आणण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
सरकारी इस्पितळ आणि संशोधन केंद्र, तुये – या गोवा मेडिकल कॉलेज संलग्न इस्पितळाचे आज दुसऱ्यांदा उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच विविध खात्यांचे अधिकारी, जिल्हा पंचायत सदस्य आणि पंचायत सदस्य उपस्थित होते. आरोग्य क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणल्याचे सांगतानाच, पेडणे परिसराचा झपाट्याने विकास होत असल्याने भविष्यातील आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन आरोग्य सेवेचा विस्तार केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. सरकार आरोग्य सेवा देण्याबाबत कटिबद्ध आहे. लवकरच या इस्पितळात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगतानाच पेडणेतील खाजगी डॉक्टरांनी सरकारी सेवेत रुजू होऊन लोकांची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले. पुढील तीन ते सहा महिन्यांत ऑपरेशन थिएटर्स कार्यान्वित केले जातील. त्यामुळे पेडणेतील लोकांना म्हापसा किंवा पणजीत धाव घेण्याची गरज पडणार नाही, असेही ते म्हणाले.
स्वप्न मार्गी लागले
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या संकल्पनेतून हे इस्पितळ उभे राहिले आहे. आज त्यांच्या या योगदानाची विशेष दखल सरकारने घेतली. आपले स्वप्न पूर्ण झाले नाही, तरी स्वप्न मार्गी लागले आहे. जोपर्यंत इस्पितळातील सेवा लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जाईल, असे ते म्हणाले. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दोघेही निश्चितपणे हे काम मार्गी लावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मनोमिलनाचा क्षण
इस्पितळाच्या या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मनोमिलन झाले. आरोग्यमंत्र्यांनी हात उंचावून या मनोमिलनाची प्रचिती दिली. याशिवाय आमदार जीत आरोलकर आणि प्रविण आर्लेकर यांच्यातील तणावाचे रूपांतरही मिलनात झाल्याने हा क्षण मनोमिलनाचाच ठरला.

  • Related Posts

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    जांबावली – श्री रामनाथ दामोदर संस्थानतर्फे १११ व्या पिंडीकोत्सवा निमीत्त बुधवार २५ मार्च २०२६ रोजी आयोजित कुशावती नदी आरती सोहळ्यास गोवा तसेच कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून आलेल्या भक्तांची भव्य उपस्थिती लाभली.…

    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    जीसीझेडएमएच्या निरीक्षणांकडे सरकारचे दुर्लक्ष गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) मांडवी नदीत डेल्टा प्लेझर क्रूझ कंपनी प्रा. लि. यांच्या एम.व्ही. डेल्टीन रॉयल या नव्या भव्य जहाजास परवानगी देण्यासंदर्भात गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन…

    You Missed

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    26/03/2026 e-paper

    26/03/2026 e-paper

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi