पिता-पुत्राकडून ‘स्मार्टसिटी’ चे वाभाडे

भाजप सरकार, पक्षाचीही कोंडी

गांवकारी,दि.१०(प्रतिनिधी)

राजधानी पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात तसेच पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहीत मोन्सेरात या पिता-पुत्रांनी पणजी स्मार्टसिटीच्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे सरकार आणि भाजप पक्षाचीच कोंडी झाली आहे. मोन्सेरात पिता-पुत्राच्या या भूमीकेमुळे स्मार्टसिटी हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याच्या विरोधकांच्या टीकेला आता महत्व प्राप्त झाले आहे.
केंद्र सरकारने देशभरातील शंभर शहरांची निवड करून स्मार्टसिटीअंतर्गत या शहरांच्या विकासाची योजना तयार केली होती. गोव्यातून पणजी शहराची निवड करण्यात आली आहे. माजी केंद्रीय सरंक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रयत्नांतून ही निवड झाली होती आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळेकर यांच्या कार्यकाळात स्मार्टसिटी योजनेच्या कामांना सुरूवात झाली होती. ही योजना ईमेजिन पणजी स्मार्टसिटी प्रा.लिमिटेड या कंपनीतर्फे राबवण्यात येत असून या कंपनीचे चेअरमन मुख्य सचिव तथा व्यवस्थापकीय संचालक / मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रीग्स(आयएएस) हे आहेत. विशेष म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांकडे या योजनेची सुत्रे सोपवून सरकार नामानिराळे होण्याचे प्रयत्न करत आहेत. मुख्य सचिवांकडून स्मार्टसिटीबाबत ब्र काढला जात नाही. या योजनेची सगळी सुत्रे अप्रत्यक्ष मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच हाताळत असल्याने त्यांनीच चेअरमनपद आपल्याकडे ठेवावे,अशी मागणी बाबुश मोन्सेरात यांनी केली आहे.
उत्पल पर्रीकर यांचा बाबुशवर निशाणा
माजी सरंक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे स्मार्टसिटीच्या विषयावरून पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांच्यावर निशाणा साधत आहेत. बाबुश मोन्सेरात हे मात्र सरकार आणि स्मार्टसिटी कंपनीवर ठपका ठेवून नामानिराळे होत आहेत. आमदार आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत, असे उत्पल पर्रीकर यांचे म्हणणे असले तरी मुळात मनोहर पर्रीकर यांच्या काळापासूनच हा घोळ सुरू आहे आणि त्यात आपल्याला अजिबात विश्वासात घेतले नसल्याचे ते खाजगीत सांगतात. स्मार्टसिटीच्या या घोळाला माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळेकर हे देखील तेवढेच जबाबदार आहेत,असेही त्यांचे म्हणणे आहे. आता उघडपणे असे आरोप करणे पक्षाला रूचणार नसल्याने स्मार्टसिटीबाबत प्रतिक्रियाच देऊ नये,असेच आपण ठरवल्याचे बाबुश मोन्सेरात म्हणतात. स्मार्टसिटीच्या घोळाला सिद्धार्थ कुंकळ्ळेकर हे जबाबदार असल्याचे माहित असूनही उत्पल पर्रीकर हे मात्र त्यांच्यावर टीका न करता बाबुश मोन्सेरात यांनाच लक्ष्य करत असल्यामुळे बाबुश मोन्सेरात यांचे समर्थकही उघडपणे बोलतात. अप्रत्यक्ष बाबुश मोन्सेरात यांच्या या भूमीकेमुळे भाजपची कोंडी झाली आहे.

  • Related Posts

    रवी नाईक – आगे बढ़ो!

    सध्याच्या परिस्थितीत सर्वच मंत्र्यांनी गप्प राहण्याचा पवित्रा घेतलेला असताना, रवी नाईक यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित होते. गोव्याचे पात्रांव, म्हणजेच फोंड्याचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक. कधीकाळी गृहमंत्री असताना गुंडगिरीवर…

    ʻमै झुकेगा नही सालाʼ !

    या एक वर्षाच्या प्रवासात आपण जशी साथ दिली, तशीच ती पुढेही चालू राहिली आणि त्यात अधिक भर पडली तर नक्कीच हा ʻगांवकारीʼचा प्रयोग मुक्त, स्वतंत्र पत्रकारितेचा एक नवा मानबिंदू ठरू…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    15/07/2025 e-paper

    15/07/2025 e-paper

    संयुक्त मामलेदाराचा ‘राखणदार’ कोण?

    संयुक्त मामलेदाराचा ‘राखणदार’ कोण?

    धन्य, धन्य ते अंत्योदयकर्ते!

    धन्य, धन्य ते अंत्योदयकर्ते!

    14/07/2025 e-paper

    14/07/2025 e-paper

    आसगांवच्या पठारावर कोणाचा प्रकल्प?

    आसगांवच्या पठारावर कोणाचा प्रकल्प?

    पंचायत संचालकांच्या यशाचे गुपित काय?

    पंचायत संचालकांच्या यशाचे गुपित काय?
    error: Content is protected !!