“ रो-रो फेरीबोटी खरेदी करा ”

सुदीप ताम्हणकरांचा सरकारला सल्ला

गांवकारी, दि. ३१ (प्रतिनिधी)

चोडण–रायबंदर जलमार्गावरील रो-रो फेरीसेवा सरकारने भाडेतत्त्वावर न चालवता स्वतः फेरीबोटी खरेदी करून चालवाव्यात, असा सल्ला आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी दिला आहे. यापूर्वी २९ मे २०२६ रोजी सादर केलेल्या निवेदनाच्या पाठपुराव्याअंतर्गत सरकारला स्मरणपत्र पाठवून त्यांनी याची आठवण करून दिली आहे.
माहिती अधिकार कायद्याखाली मिळवलेल्या माहितीप्रमाणे, जुलै २०२५ ते मे २०२६ या कालावधीत चोडण–रायबंदर मार्गावरील दोन रो-रो फेरीबोट सेवेमधून नदी परिवहन विभागाला ९२.५५ लाखांचे उत्पन्न मिळाले. मात्र, याच कालावधीत विजय मरीन सर्व्हिसेस या कंपनीला भाडे म्हणून ₹१०.६५ कोटी अदा करण्यात आले. त्यामुळे सुमारे ९.७३ कोटींचा तुटवडा सार्वजनिक निधीतून भरून काढावा लागला. “हा प्रकार सरकारच्या वित्तीय व्यवस्थापनात कसा बसतो?” असा सवाल ताम्हणकर यांनी उपस्थित केला.
सध्या ‘द्वारका’ आणि ‘गंगोत्री’ या दोन रो-रो फेरीबोटींच्या संचालनासाठी १० जुलै २०२५ ते ३१ मे २०२६ या कालावधीत ६.३९ लाख लिटर डिझेल वापरण्यात आले असून, यावर ६.३० कोटींचा खर्च झाला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
यापूर्वी सरकारने दोन नवीन रो-रो फेरीबोटी खरेदी करण्यासाठी सुमारे २५ कोटींचा अंदाजित खर्च विचारात घेतला होता. मात्र, जर पुढील पाच ते सहा वर्षे भाडेतत्त्वावरील सेवा सुरू ठेवली, तर सरकारला ४८ ते ५८ कोटी रुपये खर्च करावे लागू शकतात. त्याऐवजी स्वतःच्या फेरीबोटी खरेदी केल्यास त्या सरकारची कायमस्वरूपी मालमत्ता ठरतील आणि दीर्घकालीन आर्थिक बचतही होईल, असे ताम्हणकर यांनी सूचवले आहे.

  • Related Posts

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांचा गोमंतकीयांना संदेश गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोमंतकीयांसह देश-विदेशातील भारतीयांना शुभेच्छा देताना पर्यावरण संरक्षण, स्थानिक रोजगार, सामाजिक सलोखा…

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    म्हार्दोळ, दि. १३ (प्रतिनिधी) : गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या दीर्घ लढ्याने गुरुवारी माडदोळ येथे आयोजित ‘उटा महामेळाव्या’त पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुसळधार पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने एसटी समाजबांधव या महामेळाव्याला उपस्थित राहिले. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजासाठी चार मतदारसंघ आरक्षित झालेच पाहिजेत, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure