सुलेमान प्रकरणी सरकार चक्रव्युहात

विरोधक आक्रमक, सरकारात मात्र गुढ शांतता

पणजी,दि.१६(प्रतिनिधी)

वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल झालेला सराईत गुन्हेगार सुलेमान उर्फ सिद्धीकी खान याने गुन्हा शाखेतील कोठडीतून केलेले पलायन आणि काल जारी केलेला व्हिडिओ यामुळे सरकार पूर्णपणे चक्रव्युहात सापडले आहे. विरोधकांनी या विषयावर चौफेर टीका सुरू केली असून सरकार आणि सरकार पक्षात मात्र गुढ शांतता पसरली आहे.
विरोधकांनी घेतली पोलिस महासंचालकांची भेट
रविवारी रात्री सुलेमान खानचा व्हिडिओ जारी झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या व्हिडिओमुळे सरकार आणि विशेषतः पोलिस खात्याची पूर्णपणे नाचक्की झाली. सुलेमानचा विषय हा देखील जमीन व्यवहारांशी संबंधीत आहे आणि त्यात राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचेही त्याच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. आपल्याला गुन्हा शाखेतून पोलिसांनीच पळायला भाग पाडल्याचा सनसनाटी खुलासा त्याने केला आहे. आम आणि काँग्रेस पक्षाच्या संयुक्त शिष्टमंडळाने पोलिस महासंचालकांची भेट घेऊन तो पळाला त्या दिवसाचे सगळे सीसीटीव्ही फुजेट सार्वजनिक करा,अशी मागणी केली आहे.
राज्यपालांनी हस्तक्षेप करावा
सरकारच्या गृह खात्याने सर्वोच्च खालची पातळी गाठली आहे. राजकारणी आणि गुन्हेगारांचे साटेलोटे सर्वोच्च पातळीवर पोहचले आहे. जमीन हडप, जमीन रूपांतरणे आणि गोवा विकण्याचेच प्रकार सुरू आहेत, त्याचीच ही परिणती आहे,असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. राज्यपालांनी ताबडतोब हस्तक्षेप करून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून याबाबतचा जाब विचारावा आणि संबंधीतांना निलंबित करण्यात यावे,असेही आलेमाव म्हणाले.
सुलेमानचा शोध ही प्राथमिकता- डीजीपी
पोलिस महासंचालकांनी सुलेमानची अटक ही पोलिसांची प्राथमिकता असल्याचे म्हटले आहे. सुलेमान हा हुशार गुन्हेगार असून तपासाची दिशाभूल करण्यासाठीच तो व्हिडिओतून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत आहे,असेही ते म्हणाले. त्याला ताब्यात घेतल्यावरच त्याने केलेल्या विधानाबाबतची चौकशी करता येईल,असेही पोलिस महासंचालक म्हणाले.
सरकारात गुढ शांतता
नोकऱ्यांच्या विषयावरून वातावरण कुठे शांत होते तोच आता सुलेमान प्रकरणाने डोके वर काढल्याने सरकारची कोंडी झाली आहे. सरकार आणि सत्ताधारी भाजपात गुढ शांतता पसरली आहे. विरोधकांच्या टीकेला कसे उत्तर द्यावे याची रणनिती आखली जात आहे. केंद्रीय स्तरावरही या घडामोडींची दखल घेण्यात आली असून लवकरच केंद्रीय निरीक्षक गोव्यात येण्याची शक्यता सुत्रांनी दिली.

  • Related Posts

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    लोकसभेला पुरवली प्रॉपर्टी कार्डची खोटी माहिती पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) राज्यातील ग्रामीण भागांतील लोकांच्या घरांचे भूमापन करून त्यांना मालकीचा दाखला प्रदान करण्यासंबंधीच्या केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेत गोवा सरकार सपशेल नापास…

    दोन मंत्र्यांच्या कार्यालयात ‘दिदि’गिरी!

    मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करूनही काही उपयोग होत नाही पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) राज्यात कॅश फॉर जॉब प्रकरणांतून मंत्र्यांकडील सलगीचा वापर करून नोकरीचे आमिष दाखवून शेकडो बेरोजगारांना गंडा घातलेल्या महिलांचे उदाहरण ताजे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    18/01/2025 e-paper

    18/01/2025 e-paper

    सूर्याचे लग्न !

    सूर्याचे लग्न !

    दामू नाईक व्हा पुढे…

    दामू नाईक व्हा पुढे…

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष दामू कार्यकर्तृत्व महती त्याची काय वानू..!!

    नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष दामू कार्यकर्तृत्व महती त्याची काय वानू..!!

    ‘गांव जाला जाण्टो’ आता मुंबईत

    ‘गांव जाला जाण्टो’ आता मुंबईत
    error: Content is protected !!