वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ


पणजी, दि. २९: वटपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सोमवारी राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी १० वाजता दिवाडीतील श्री भाविका देवी कोटारेश्वर देवस्थान, वंजुवे (मळार, दिवाडी) येथे आयोजित करण्यात आला आहे.

ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाचा भाग असून, राज्यभर मोठ्या प्रमाणावर वडाची झाडे लावून पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याचा सरकारचा उद्देश आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने नागरिकांनीही वडाचे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यापूर्वी जाहीर केलेल्या ‘हरित गोवा, स्वच्छ गोवा’ अभियानाअंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचा संकल्प करण्यात आला असून, ही वटवृक्ष लागवड मोहीम त्या व्यापक पर्यावरण उपक्रमाचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.

  • Related Posts

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    Goa University is preparing for a leadership transition, and the selection of its 10th Vice-Chancellor is crucial. After five years marked by academic reforms and controversies, the new appointment will determine the university’s direction for years to come, requiring a leader who can restore trust, transparency, academic freedom, and institutional excellence.

    कंत्राटी कर्मचारी कायम, २ हजार नोकऱ्या

    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्वातंत्र्यदिनी मोठी घोषणा गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी अथवा अन्य स्वरूपात १० वर्षापासून दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री…

    You Missed

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    15/08/2026 e-paper

    15/08/2026 e-paper

    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???

    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???

    कंत्राटी कर्मचारी कायम, २ हजार नोकऱ्या

    कंत्राटी कर्मचारी कायम, २ हजार नोकऱ्या

    विकसित भारत : समृद्ध गोवा

    विकसित भारत : समृद्ध गोवा

    Dipaji Rane Remembered at Historic Nanus Fort; Demand Raised for Statue in Valpoi

    Dipaji Rane Remembered at Historic Nanus Fort; Demand Raised for Statue in Valpoi