२४ जुलै रोजी ‘विष्णू सूर्या वाघ स्मृती व्याख्यानमाला डॉ. लक्ष्मण यादव यांचे उद्घाटकीय व्याख्यान

गांवकारी,दि. १९ : गोवा विधानसभेचे माजी उपसभापती, ख्यातनाम लेखक, नाटककार, कवी आणि बहुजन नेते स्व. विष्णू सूर्या वाघ यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त ‘विष्णू सूर्या वाघ मित्रपरिवारा’तर्फे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वार्षिक व्याख्यानमाला सुरू करण्यात येणार आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझाच्या मुख्य सभागृहात होणार आहे.

व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात दिल्ली येथील माजी प्राध्यापक तथा प्रख्यात बहुजन विचारवंत आणि लेखक डॉ. लक्ष्मण यादव हे ‘बहुजन राजकारण : परंपरा और इतिहास’ या विषयावर उद्घाटकीय व्याख्यान देणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा विद्यापीठाचे प्राध्यापक आणि युवा विचारवंत प्रा. युगांक नाईक असतील.

विष्णू सूर्या वाघ यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि गोव्यातील बहुजन समाजात वैचारिक चळवळीला अधिक बळ देणे, या उद्देशाने यंदापासून या वार्षिक व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

विष्णू वाघ मित्रपरिवारातर्फे गेल्या काही वर्षांपासून वाघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काव्यवाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि परिसंवादांसह विविध राज्यस्तरीय उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांचा पुढचा टप्पा म्हणून आता दरवर्षी स्मृती व्याख्यान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उद्घाटकीय व्याख्यानाचे प्रमुख वक्ते डॉ. लक्ष्मण यादव हे उच्च शिक्षण, सामाजिक न्याय तसेच बहुजन, दलित आणि आदिवासी समाजाच्या हक्कांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडणारे विचारवंत म्हणून ओळखले जातात. अलाहाबाद विद्यापीठातून सुवर्णपदकासह उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून संत-कवी तुलसीदास यांच्या साहित्यावर संशोधन करून पीएच.डी. पदवी संपादन केली. दिल्ली विद्यापीठाच्या झाकीर हुसेन दिल्ली कॉलेजमध्ये त्यांनी सुमारे १४ वर्षे हिंदीचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून अध्यापन केले.

समाजवाद, आंबेडकरवाद आणि स्त्रीवादी विचारांच्या प्रभावातून सामाजिक व राजकीय प्रबोधनाच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या डॉ. यादव यांनी सध्या पूर्णवेळ या कार्याला वाहून घेतले आहे. उच्च शिक्षण व्यवस्थेतील वास्तव मांडणारे ‘प्रोफेसर की डायरी’ आणि सामाजिक समतेच्या मुद्द्यांवर भाष्य करणारे ‘जाती जनगणना’ ही त्यांची पुस्तके विशेष चर्चेत राहिली आहेत.

विष्णू वाघ मित्रपरिवाराचे निमंत्रक आणि स्व. विष्णू वाघ यांचे बंधू प्रा. रामराव सूर्या वाघ यांनी वाघ यांच्या चाहत्यांसह लेखक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतांनी या व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. गोव्यात बहुजनवादाची वैचारिक चळवळ अधिक व्यापक आणि बळकट करण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

२४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा, पणजी येथे होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

  • Related Posts

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांचा गोमंतकीयांना संदेश गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोमंतकीयांसह देश-विदेशातील भारतीयांना शुभेच्छा देताना पर्यावरण संरक्षण, स्थानिक रोजगार, सामाजिक सलोखा…

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    म्हार्दोळ, दि. १३ (प्रतिनिधी) : गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या दीर्घ लढ्याने गुरुवारी माडदोळ येथे आयोजित ‘उटा महामेळाव्या’त पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुसळधार पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने एसटी समाजबांधव या महामेळाव्याला उपस्थित राहिले. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजासाठी चार मतदारसंघ आरक्षित झालेच पाहिजेत, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure