राज्याच्या ‘केअर्स’ समितीवर मांगिरीश, सुनया यांची नियुक्ती

गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी)
राज्यातील शाळांमध्ये कोडिंग आणि रोबोटिक्स शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘कोडिंग अँड रोबोटिक्स एज्युकेशन इन स्कूल्स’ (केअर्स) योजनेच्या पुनर्गठित राज्यस्तरीय समितीवर उमंग ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहसंस्थापक मांगिरीश सालेलकर आणि एशियर सोल्युशन्सच्या संस्थापक संचालिका सुनया शिरोडकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे. राज्यभरातील शाळांमध्ये केअर्स योजनेची प्रभावी अंमलबजावणी, धोरणात्मक मार्गदर्शन, योजनेच्या प्रगतीवर देखरेख आणि आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी या समितीवर आहे.

शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा, तसेच विद्यार्थ्यांना कोडिंग, रोबोटिक्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान मिळावे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाधारित संधींसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने केअर्स योजना महत्त्वाची मानली जात आहे.

  • Related Posts

    प्रकाशपर्वातून नव्या गोव्याचा संकल्प !

    या दिवाळीत केवळ घरे उजळवू नका, मनेही उजळवा. निसर्गाला जपा, माणुसकीला कवटाळा आणि संविधानाच्या मूल्यांना बळ द्या. कारण गोव्याचे खरे वैभव त्याच्या इमारतींत किंवा संपत्तीत नाही, तर इथल्या निसर्गात, संस्कृतीत…

    सचिवांकडून सरपंचानाच कारणे दाखवा !

    चिखलीच रंगले राजकीय नाट्य —————————————————————————— गांवकारी,दि. ५ (प्रतिनिधी) चिखली पंचायतीचे सरपंच कमलप्रसाद यादव यांना त्यांच्याच पंचायत सचिवांकडून कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. दाबोळी येथील सर्व्हे क्रमांक ३/१, ५/१…

    You Missed

    Smart Meter Naka Demands Scrapping of Goa’s Smart Meter Project, Seeks Meeting with CM

    Smart Meter Naka Demands Scrapping of Goa’s Smart Meter Project, Seeks Meeting with CM

    Prabhav Naik Exposes Sewage Menace in Margao Again; Questions Government’s Neglect of Public Health

    Prabhav Naik Exposes Sewage Menace in Margao Again; Questions Government’s Neglect of Public Health

    गोव्यातील उद्योगांनी स्थानिक वाहतूकदारांनाच प्राधान्य द्यावे; सुदीप ताम्हणकरांची जीआयडीसीकडे मागणी

    गोव्यातील उद्योगांनी स्थानिक वाहतूकदारांनाच प्राधान्य द्यावे; सुदीप ताम्हणकरांची जीआयडीसीकडे मागणी

    जे का रंजले गांजले…!

    जे का रंजले गांजले…!

    तेरेखोल नदीतील बेकायदा रेती उपशावर कठोर कारवाई करा!

    तेरेखोल नदीतील बेकायदा रेती उपशावर कठोर कारवाई करा!

    Together For Mapusa Demands AI CCTV Surveillance, City-Wide Safety Audit

    Together For Mapusa Demands AI CCTV Surveillance, City-Wide Safety Audit