अजित कामत शंखवाळकर अखेर शरण

४५ दिवस दिला पोलिसांना गुंगारा
———………………………………………..
गांवकारी,दि.२३(प्रतिनिधी)
राज्य अबकारी आयुक्तपदाचे बनावट नियुक्तपत्र तयार करणे तथा नोकरी देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेला अजित कामत शंखवाळकर हा अखेर ४५ दिवसांनी पोलिसांना शरण आला. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळणे आणि उमेदवारांची दिशाभूल करण्यासाठी बनावट नियुक्तिपत्रांचा वापर करणे, असे गंभीर आरोप अजित कामत शंखवाळकर यांच्यावर करण्यात आले आहेत. शंखवाळकर यांच्या शरणागतीमुळे या कथित घोटाळ्याच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. पोलिस खात्यातील बहुतेक सर्वंच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अजित शंखवाळकर यांचे घनिष्ट संबंध आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या वर्तुळातच त्याचा वावर होता आणि त्यामुळे अनेकांना ते पोलिस अधिकारी असल्याचेच वाटत होते. काही पोलिस अधिकारी तर त्याला चक्क आपल्या खुर्चीवर बसण्याची परवानगी देत होते,अशीही चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे.
तपासातून उघड होणार मोडस ऑपरेंडी
या एकूणच प्रकरणी अजित कामत शंखवाळकर याने नियुक्तिपत्रे नेमकी कशी तयार केली, त्यांचा वापर कोणत्या पद्धतीने करण्यात आला आणि या व्यवहारांमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता, हे प्रश्न तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. ८ ऑक्टोबर रोजी मनोज तळेकर हे अतिरिक्त अबकारी आयुक्तपदाचे नियुक्तिपत्र घेऊन पणजीतील अबकारी आयुक्त कार्यालयात रुजू होण्यासाठी पोहोचले होते. मात्र, अधिकाऱ्यांना संशय आल्याने चौकशी सुरू झाली आणि नियुक्तिपत्र बनावट असल्याचे समोर आले. या पत्रावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कथित बनावट स्वाक्षरी असल्याचाही आरोप आहे.

तळेकर कुटुंबाच्या तक्रारीनुसार, मनोज यांना सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी २७ लाख रुपये, तर त्यांच्या बहिणीला नोकरी देण्यासाठी २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप शंखवाळकर यांच्यावर आहे. याशिवाय जमीन व्यवहारातील ८० लाख रुपयांच्या कथित फसवणुकीचाही आरोप असून, एकूण रक्कम १.३२ कोटी रुपयांपर्यंत जाते.
या प्रकरणात पणजी पोलिसांनी दोन गुन्हे नोंदवले होते. ८ ऑक्टोबरपासून शंखवाळकर फरार असल्याचे वृत्त होते. त्यांचा शोध घेण्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली होती. त्यांचे बँक खातेही गोठविण्यात आले होते.

अजित कामत शंखवाळकर हा सरकारच्याच कॅश फॉर जॉब घोटाळ्याचा एक भाग असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पोलिसांसोबत रोज वावरणारी व्यक्ती ४६ दिवस पोलिसांना गुंगारा देऊन लपून राहते ही गोष्टच मुळात हजम होणारी नाही आणि त्यामुळे आता त्याला मोकळे सोडण्याची सगळी तयारी करूनच शरणागती पत्करण्यास भाग पाडल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला आहे.

  • Related Posts

    Goa Government Must Protect Sailor Dilesh Teli’s Future, Frame Welfare Policy for Goans Working Abroad: Prabhav Naik

    Margao, 23 November: Madganvcho Awaaz Youth Leader Prabhav Naik has urged the Goa Government to safeguard the career, livelihood and financial security of young Goan sailor Dilesh Chandrakant Teli, who reportedly survived a missile attack on an LPG tanker in the Strait of Hormuz. Expressing concern over the traumatic incident, Naik prayed for Teli’s speedy recovery and safe return home. He stressed that the government must ensure the incident does not jeopardise the young sailor’s professional future or leave his family facing financial uncertainty.

    North Goa Special Revenue Courts Dispose of 396 Cases in Single Day

    In a major initiative to expedite the disposal of pending land and revenue disputes, the North Goa District Administration disposed of 396 cases during special revenue court hearings conducted across five talukas on Saturday.

    You Missed

    श्री रुद्रेश्वर देवस्थान समितीवर यशवंत माडकर यांच्या पॅनेलचे वर्चस्व

    श्री रुद्रेश्वर देवस्थान समितीवर यशवंत माडकर यांच्या पॅनेलचे वर्चस्व

    अजित कामत शंखवाळकर अखेर शरण

    अजित कामत शंखवाळकर अखेर शरण

    सरकारी कार्यालये कालबाह्य?

    सरकारी कार्यालये कालबाह्य?

    23/11/2026 e-paper

    23/11/2026 e-paper

    Goa Government Must Protect Sailor Dilesh Teli’s Future, Frame Welfare Policy for Goans Working Abroad: Prabhav Naik

    Goa Government Must Protect Sailor Dilesh Teli’s Future, Frame Welfare Policy for Goans Working Abroad: Prabhav Naik

    North Goa Special Revenue Courts Dispose of 396 Cases in Single Day

    North Goa Special Revenue Courts Dispose of 396 Cases in Single Day