सांखळी, दि. २३ (प्रतिनिधी) :
हरवळे- साखळी येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत यशवंत माडकर यांच्या पॅनेलने सातही जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. ही निवड २०२५ ते २०२८ या कार्यकाळासाठी झाली आहे.
मुख्य व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी यशवंत मडकऱ, खजिनदारपदी दीपक नाईक, अँटर्नीपदी सुभाष किनळकर, तर सचिवपदी संगेश कुंडईकर यांची निवड झाली आहे.
पर्यायी समितीच्या अध्यक्षपदी दिलीप नाईक, खजिनदारपदी विघ्नेश शेट्ये, अटर्नीपदी वासुदेव गावकर आणि सचिवपदी दामोदर नाईक यांची निवड झाली आहे. या निकालामुळे देवस्थानच्या व्यवस्थापनावर माडकर पॅनेलचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.






