परशुराम कोटकर यांचे निधन

पक्षनिष्ठेचा आदर्श हरवला

पेडणे,दि.१७(प्रतिनिधी)

गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांचे निस्सीम भक्त, मगोचे ज्येष्ठ नेते तथा पेडणेचे माजी आमदार परशुराम कोटकर यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकारणातील पक्षनिष्ठेचा एक आदर्श हरवला,अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
गोवा विधानसभेतून १९९४ साली पेडणे मतदारसंघातून ते मगोचे आमदार म्हणून निवडून आले होते. अत्यंत साधारण राहणीमान, स्पष्टवक्तेपणा, मगो पक्षाबद्दल प्रचंड निष्ठा आणि जनसेवेची तळमळ हे त्यांचे गुण होते. तत्कालीन काँग्रेस पक्षाकडून मगो पक्षातील आमदारांना फोडून सत्ता स्थापन करण्याचा बाजार सुरू असता त्यावेळी त्यांच्यासमोर ऑफर असूनही त्यांनी मगो पक्षाचा विश्वासघात करण्यास स्पष्ट नकार दिला. फक्त एकदाच आमदार बनण्याची संधी त्यांना प्राप्त झाली असली तरी मगो व्यतिरीक्त त्यांनी अन्य पक्षात जाण्याचा कधीच विचार केला नाही आणि शेवटपर्यंत मगोनिष्ठ म्हणून आपली राजकीय पवित्रता जपली.
पेडणे नगरपालिकेचे २० वर्षे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. आदर्श क्रीडा क्लबच्या माध्यमातून त्यांनी आपले कार्य केले. मगो पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीवर ते सातत्याने होते. ढवळीकरबंधूंच्या कार्यपद्धतीला आव्हान देण्याचे धाडस ते नेहमीच करत होते आणि ढवळीकरबंधूंकडूनही त्यांचा पक्षाचे ज्येष्ठ नेते या नात्याने आदर राखला जात होता. राजकारणात स्वार्थाला बळी न पडल्यामुळे समाजमानसात त्यांना प्रचंड आदर होता.

  • Related Posts

    गोव्याची जमीन वाचवण्यासाठी ‘कृषी जमीन संरक्षण कायदा २०२६’

    न्या. रिबेलो यांचा ऐतिहासिक कायदेबदलांचा प्रस्ताव गोव्याची शेतीजमीन, डोंगर, नैसर्गिक उतार, खाजन क्षेत्रे आणि गावांचे अस्तित्व वाचवण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी ‘गोवा कृषी जमीन संरक्षण कायदा २०२६’ या नावाने…

    ही अघोषित आणीबाणी तर नव्हे?

    घोषित आणीबाणीत अधिकार कायद्याने हिरावले जातात; अघोषित आणीबाणीत ते भीतीच्या वातावरणातून निष्प्रभ केले जातात. लोकशाहीत सरकारला विरोध करणे हा गुन्हा नाही आणि सरकारच्या निर्णयांविरोधात शांततामय आंदोलन करणे हा नागरिकांचा घटनात्मक…

    You Missed

    Chicalim Panchayat Secretary Issues Show-Cause Notice to Own Sarpanch Over Alleged Illegal Commercial Complex

    Chicalim Panchayat Secretary Issues Show-Cause Notice to Own Sarpanch Over Alleged Illegal Commercial Complex

    कुणीतरी टॉयलेट द्या हो !

    कुणीतरी टॉयलेट द्या हो !

    पायलटांच्या प्रलंबित योजना आठ दिवसांत सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

    पायलटांच्या प्रलंबित योजना आठ दिवसांत सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

    Goa Government Signs MoU with The Modern Data Company to Introduce AI in Governance

    Goa Government Signs MoU with The Modern Data Company to Introduce AI in Governance

    राज्याच्या ‘केअर्स’ समितीवर मांगिरीश, सुनया यांची नियुक्ती

    राज्याच्या ‘केअर्स’ समितीवर मांगिरीश, सुनया यांची नियुक्ती

    भोमा महामार्ग वाद प्रकरणी उच्च न्यायालयाकडून मध्यस्थाची नियुक्ती

    भोमा महामार्ग वाद प्रकरणी उच्च न्यायालयाकडून मध्यस्थाची नियुक्ती