‘भूतानी’वरून सरकारात तूतू-मैमै…

प्रकरण पोहचले मुंबई उच्च न्यायालयात
पणजी,दि.17(प्रतिनिधी): सांकवाळ-सावरफोंड येथील वादग्रस्त भूतानी कंपनीच्या प्रकल्पावरून आता सरकारातच तु तु मै मै सुरू झाले आहे. एकीकडे नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे आपला ह्यात तिळमात्र संबंध नाही असे म्हणत असतानाच मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी आपले भूतानीकडे कसलेच संबंध नाहीत असा दावा केला आहे.

मुख्यमंत्री आणि नगर नियोजनमंत्री दोघेही हात वर करत असतील तर मग या प्रकल्पाला परवानगी द्यायला भूत आले होते काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणी काही स्थानिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली असून आज ही याचिका सुनावणीसाठी आली होती. सरकारची आता खरी कसोटी न्यायालयात लागणार आहे. कंपनीकडून राज्यातील एका बड्या वकिलांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पुढील बैठकीत परवाना रद्द करणार

भूतानी प्रकल्पावरून विनाकारण आपल्याला लक्ष्य केले जात आहे. पुढील टीसीपी बैठकीत हा विषय चर्चेला घेणार असून कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास त्वरीत परवाना रद्द करण्यात येईल असे विश्वजीत राणे यांनी सांगितले.

परवाना कुणी दिला ते शोधा

आपला भूतानीशी संबंध नाही. या प्रकल्पाला कुणी परवाने दिले हे शोधुन काढा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी केले.
दरम्यान भाजप सरकारच्या कार्यकाळातच ही परवानगी मिळाली असताना सरकारच हात झटकू लागल्याने सरकारचीच या प्रश्नी कोंडी झाली आहे.

  • Related Posts

    Curchorem: Subhash Phal Dessai Seeks People’s Blessings Ahead of Political Shift

    Former Sanguem MLA Subhash Phal Dessai seeks public acceptance and blessings in Curchorem constituency ahead of his new political journey after Sanguem became a reserved constituency.

    सरकारी कंत्राटी कामगार अस्वस्थ

    दीर्घकाळ सेवा बजावूनही नियमितीकरण नाहीगांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाने पीडब्ल्यूडी कामगार पुरवठा सोसायटीतील दीर्घकालीन कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्यानंतर आता विविध सरकारी खात्यांतील कंत्राटी कामगारांत…

    You Missed

    Curchorem: Subhash Phal Dessai Seeks People’s Blessings Ahead of Political Shift

    Curchorem: Subhash Phal Dessai Seeks People’s Blessings Ahead of Political Shift

    सरकारी कंत्राटी कामगार अस्वस्थ

    सरकारी कंत्राटी कामगार अस्वस्थ

    न्यायाचा विजय की राजकीय डावपेच?

    न्यायाचा विजय की राजकीय डावपेच?

    RTI documents reveal Land Grabbing Commission held three persons responsible in Dhargal land case

    RTI documents reveal Land Grabbing Commission held three persons responsible in Dhargal land case

    Former GPCC President Amit Patkar, Goa Forward Oppose Proposed FCRA Amendments; Seek Protection for Goa’s Charitable Institutions

    Former GPCC President Amit Patkar, Goa Forward Oppose Proposed FCRA Amendments; Seek Protection for Goa’s Charitable Institutions

    Centre Notifies Goa ST Political Reservation Act; Process Begins for Reservation of Four Assembly Constituencies

    Centre Notifies Goa ST Political Reservation Act; Process Begins for Reservation of Four Assembly Constituencies