आगरवाडा- चोपडेत आज जनऊठाव


डोंगर पठाराच्या रूपांतरणाविरोधात आक्रोश मोर्चा
पेडणे,दि.२(प्रतिनिधी)- पेडणे तालुक्यातील आगरवाडा- चोपडे गावातील डोंगर पठारावरील सुमारे ३ लाख चौ.मीटर जमीनीचे रूपांतर करून ही जमीन बांधकामांसाठी खुली केल्याच्या निषेधार्थ आगरवाडा- चोपडे नागरिकांनी आज आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. राज्यभरातील सामाजिक संघटना तथा जागृत नागरिक या मोर्चात सहभागी होणार आहेत.
लहान गावांवर अस्मानी संकट
शापोरा नदीच्या किनारी वसलेला आगरवाडा- चोपडे हा छोट्यासा गांव. या गांवच्या माथ्यावर डोंगर पठार असून हा डोंगर या गांवचा राखणदाता आहे. या डोंगराच्या पायथ्याशी हा गांव वसला आहे. पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील आणि गांवच्या काजू बागायती तथा पाण्याचा स्त्रोत असलेल्या या डोंगराचे काँक्रिटीकरण झाल्यास संपूर्ण गांव उध्वस्त होणार आहे. हा डोंगर सेटलमेंट करून व्यवसायिक बांधकामांसाठी खुला करणे म्हणजे आगरवाडा- चोपडेवासीयांच्या भवितव्याचा गळा घोटणे ठरणार असल्याने स्थानिकांनी या भूरूपांतरणाला तीव्र विरोध केला आहे.
स्थानिक आमदाराचा पाठींबा
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी या विषयी स्थानिकांना आपला पाठींबा दर्शवला आहे. ते सरकारातीलच आमदार आहेत आणि स्थानिकांसोबत आहेत. एवढे करून स्थानिकांच्या मागणीनुसार हे भूरूपांतर रद्द झाले नाही तर मग त्यांच्या पाठींब्याचा उपयोग काय,असा सवाल काही नागरिक करत आहेत. आमदारांनी आपले राजकीय वजन वापरून मुख्यमंत्री आणि नगर नियोजनमंत्र्यांकडे चर्चा करून हे भूरूपांतर रद्द करावे,अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.
श्री रवळनाथ मंदिराकडे ४ वाजता प्रारंभ
आगरवाडा-चोपडे येथील श्री रवळनाथ मंदिराकडे संध्याकाळी ४ वाजता एकत्र येण्याचे आवाहन आगरवाडा-चोपडे नागरिक समितीने केले आहे. काल पणजीत नगर नियोजन खात्यासमोर झालेल्या आंदोलनातील अनेकजण या आंदोलनातही सहभागी होण्याची शक्यता आहे. पेडणे तालुक्यातील सर्व पंचायती तथा नागरिकांनाही पाठींबा देण्याचे आवाहन समितीने केले होते. आता प्रत्यक्षात या आंदोलनाला किती पाठींबा मिळतो यावरून सरकार या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेणार आहे.
पेडणेकरांना कळकळीचे आवाहन
पेडणेकरांची एकजुट ही खूप महत्वाची आहे. आत्तापर्यंत पेडणेकरांच्या एकजुटीच्या अभावामुळेच राजकारण्यांनी पेडणेकरांचा गैरवापर केला. आता किमान पेडणेकरांनी एकजुटीचे दर्शन घडविण्याची ही वेळ आली आहे. आगरवाडा- चोपडेकरांना यापूर्वी मोपा पीडितांचे दुःख समजले नव्हते परंतु आता आपल्या गावांवर आलेल्या संकटाच्या चाहुलीमुळे मोपा आणि सभोवताली लोकांची काय अवस्था झाली असेल, याचा अंदाज येतो. आता सगळे राजकीय मतभेद विसरून पेडणेकरांनी एकत्र येऊनच हा अस्तित्वाचा लढा लढण्याची गरज आहे, असे मत विवेक गांवकर यांनी व्यक्त केले.

  • Related Posts

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    टीकाकारांच्या तोंडाला कायदेशीर कुलुप पणजी,दि.२१(प्रतिनिधी)- सनबर्न महोत्सवाचे आयोजक स्पेसबाऊंड वेब लॅब्स प्रा.लिमिटेड कंपनीकडून स्थानिक धारगळ पंचायतीचा ना हरकत दाखला. पर्यटन खात्याची तत्वतः मान्यता आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून सशर्त…

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    खाते विश्वजीतांकडे, सेवावाढीची मेहरनजर मुख्यमंत्र्यांची पणजी,दि.२०(प्रतिनिधी) नगर नियोजन खात्याचे मुख्य नगर नियोजक राजेश नाईक यांच्या सेवावाढीला नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांना जबाबदार धरले जाते. परंतु प्राप्त माहितीवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    21/12/2024 e-paper

    21/12/2024 e-paper

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    20/12/2024 e-paper

    20/12/2024 e-paper

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?
    error: Content is protected !!