मुंगुल – मडगावात ‘गँगवॉर’ !

दोघा युवकांवर हल्ला; वाहनावर गोळीबार

गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी)

मडगाव ते कोलवा रस्त्यावर मुंगुल येथे मंगळवारी सकाळी दोन युवकांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. सुमारे ४ ते ५ जणांच्या टोळीने हल्ला करून दोघा युवकांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात युवक प्रवास करत असलेल्या वाहनावर गोळीबार झाल्याचेही पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. जखमी युवकांना बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेने मडगाव नगरी हादरली असून फातोर्डा पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, हा हल्ला दोन टोळ्यांमधील शत्रुत्वातून झाला असावा. अलिकडच्या काळात गोव्यात गँगवॉरचे प्रमाण कमी झाले होते; मात्र आजच्या घटनेने टोळीयुद्ध पुन्हा डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले आहे.
रफिक तशन (२४) आणि युवकेश सिंग (२०) हे मारुती-बोलनो गाडीतून कोलवाकडून मडगावच्या दिशेने जात असताना, मुंगुल येथे मागून आलेल्या वाहनातून ४ ते ५ जणांच्या टोळीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. कोयती, लोखंडी सळ्या आणि दांड्यांचा वापर करून दोघा युवकांना गंभीर जखमी करण्यात आले. वाहनावर गोळीबार झाल्याचेही निष्पन्न झाले असून घटनास्थळी जिवंत काडतूस सापडले आहे. वाहनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.
फातोर्डा पोलिसांसमोर आव्हान
फातोर्डा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी युवकांना गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळात दाखल करण्यात आले. घटनास्थळाची तपासणी करताना जिवंत काडतूस आणि वाहनाची प्रचंड नासधूस आढळून आली. प्राथमिक तपासानुसार, हा हल्ला दोन टोळ्यांमधील वैमनस्यातून झाल्याचे दिसून येते. फातोर्डा पोलिसांनी आपली यंत्रणा तात्काळ कामाला लावली असून हल्लेखोरांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

  • Related Posts

    Ramrao Wagh Urges Goans to Oppose Government Move to Declare 56 Villages as Urban Areas

    Social and environmental activist Prof. Ramrao Wagh has called upon the people of Goa to unite against the State Government’s proposal to declare 56 villages as “Urban Areas”, warning that the move would irreversibly damage Goa’s rural character, agriculture and fragile environment.

    राष्ट्रीय महामार्गावरील निष्काळजीपणा; तांबोसे पुलावर भरधाव डंपरमधून मोठमोठे दगड कोसळले, प्रवाशांचा जीव टांगणीला

    पेडणे,दि.२५ जून: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (NH-66) वरील उगवे आणि तांबोसे दरम्यान असलेल्या तांबोसे पुलावर गुरुवारी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या एका…

    You Missed

    Ramrao Wagh Urges Goans to Oppose Government Move to Declare 56 Villages as Urban Areas

    Ramrao Wagh Urges Goans to Oppose Government Move to Declare 56 Villages as Urban Areas

    राष्ट्रीय महामार्गावरील निष्काळजीपणा; तांबोसे पुलावर भरधाव डंपरमधून मोठमोठे दगड कोसळले, प्रवाशांचा जीव टांगणीला

    राष्ट्रीय महामार्गावरील निष्काळजीपणा; तांबोसे पुलावर भरधाव डंपरमधून मोठमोठे दगड कोसळले, प्रवाशांचा जीव टांगणीला

    Brutal Murder of Senior Citizen Sparks Outrage in Goa

    Brutal Murder of Senior Citizen Sparks Outrage in Goa

    25/06/2026 e-paper

    25/06/2026 e-paper

    प्रशासनाचे इव्हेंटायझेशन !

    प्रशासनाचे इव्हेंटायझेशन !

    नामस्मरण !

    नामस्मरण !