जीआयडीसीत २.४३ कोटींचा घोटाळा

युनायटेड गोवन्स फाउंडेशनची तक्रार
गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी)

गोवा औद्योगिक विकास महामंडळ (जीआयडीसी)त २०२४ मध्ये रस्ते व खड्डे दुरुस्ती कामांत सुमारे २.४३ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार युनायटेड गोवन्स फाउंडेशनने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दक्षता विभागाकडे दाखल केली आहे.
तक्रारीत गंभीर उल्लंघनांचे आरोप करण्यात आले आहेत. ही कामे निविदा न काढता, वर्क ऑर्डर व प्रशासकीय मंजुरी न घेता करण्यात आली असल्याचे नमूद आहे. जीएफआर नियम, केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वे व सीपीडब्ल्यूडी प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचेही म्हटले आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर मागाहून अंदाजपत्रके व मंजुरी तयार करण्यात आली. नामनिर्देशन पद्धतीने कंत्राटे देऊन पक्षपात व गटबाजी करण्यात आली. काही कामे प्रत्यक्षात न झाल्याची शक्यता असूनही कंत्राटदारांना पैसे दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विधानसभा सभागृहात दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली तसेच निवडणूक आचारसंहितेदरम्यान परवानगीशिवाय कामे केल्याचाही आरोप आहे.
अधिकारी व कंत्राटदारांवर ठपका

तक्रारीत जीआयडीसीचे अध्यक्ष व आमदार रेजिनाल्ड लोरेन्सो, व्यवस्थापकीय संचालक प्रवीमल अभिषेक पोलुमटला (आयएएस), तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व सल्लागार यांची नावे नमूद आहेत. गडेकर कन्स्ट्रक्शन्स, एम अँड एम कन्स्ट्रक्शन्स व साई कमल कन्स्ट्रक्शन्स या कंत्राटदारांचा उल्लेखही करण्यात आला आहे.
युजीएफची मागणी

या प्रकरणी ताबडतोब एफआयआर नोंदणी करून चौकशी व्हावी, दक्षता/भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागामार्फत तपास व्हावा, सर्व कामांचे फॉरेन्सिक व तांत्रिक ऑडिट करण्यात यावे, २.४३ कोटींची वसुली करून दंड ठोठावावा, संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्यावर खटला दाखल करावा तसेच त्यांच्या बेकायदेशीर संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

  • Related Posts

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    काँग्रेस नेत्यांनी आरोप केला आहे की, गेल्या पंधरा वर्षांत उत्तर गोव्यात सत्ताधारी नेत्यांचाच विकास झाला असून, गोव्याच्या जमिनी बिल्डर लॉबी आणि खासगी विद्यापीठांच्या घशात घालण्याचे काम केले जात आहे.

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    रमेश तवडकर यांना पूर्ण विश्वास गांवकारी,दि.३०(प्रतिनिधी) राज्यातील अनुसुचित जमातीला राजकीय आरक्षणाच्या विषयावर आपण केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी उपेंद्र जोशी यांच्यामार्फत या गोष्टीकडे आपण जातीने लक्ष ठेवून…

    You Missed

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    30/09/2026 e-paper

    30/09/2026 e-paper

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain

    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain