‘नीट युजी २०२६’ फेरपरीक्षेची तारीख जाहीर

२१ जूनला परीक्षा

गांवकारी, दि. 15 (प्रतिनिधी)

वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट युजी २०२६’  परीक्षा आता नव्या जोमाने आणि कडक सुरक्षेत पार पडणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनेभारत सरकारच्या मान्यतेनंतर फेरपरीक्षेची अधिकृत घोषणा केली असून, ही परीक्षा येत्या २१ जून २०२६, रविवार रोजी देशभरात घेतली जाणार आहे. पेपरफुटीच्या आरोपांमुळे ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द केल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच, फेरपरीक्षेसाठी कोणतीही अतिरिक्त फी घेतली जाणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी फी भरली होती, ती त्यांना परत केली जाईल आणि परीक्षेचा खर्च ‘एनटीए’ स्वतःच्या अंतर्गत निधीतून करेल.

फेरपरीक्षेसाठी नवी प्रवेशपत्रे जारी केली जातील. ही प्रवेशपत्रे १४ जून २०२६ पर्यंत ‘एनटीए’च्या अधिकृत संकेतस्थळावर (neet.nta.nic.in) उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांनी आपले जुने ओळखपत्र न वापरता, नवे प्रवेशपत्र डाऊनलोड करणे अनिवार्य आहे.

३ मे रोजी झालेल्या परीक्षेत पेपरफुटीचा संशय आल्याने सध्या सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. तपासातून समोर आले आहे की, काही टोळ्यांनी विद्यार्थ्यांकडून ३ ते ५ लाख रुपये घेऊन पेपर पुरवला होता. या पार्श्वभूमीवर, २१ जून रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यात येणार आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी डिजिटल पाळत आणि गोपनीय साहित्याची हाताळणी यावर विशेष लक्ष दिले जाईल.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यार्थी आणि पालकांना सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. केवळ अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अडचणींच्या वेळी विद्यार्थी ०११-४०७५९००० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

या फेरपरीक्षेमुळे लाखो वैद्यकीय इच्छुकांना पुन्हा एकदा न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आता हे आव्हान पेलण्यासाठी विद्यार्थी पुन्हा एकदा तयारीला लागले आहेत.

  • Related Posts

    SIO Goa Demands Public Apology, Accountability Over Withdrawn DoE Circular

    The Students Islamic Organisation (SIO) of India, Goa Zone, has demanded accountability from the Directorate of Education (DoE) over a withdrawn circular that allegedly described the organisation as “potentially anti-social and anti-national,” stating that the withdrawal alone cannot undo the damage caused to its reputation.

    Goa Can Become India’s First Zero Road Fatality State: Justice Abhay Sapre

    Goa has the potential to become India’s first state with zero road accident fatalities, former Supreme Court judge Justice Abhay Manohar Sapre said, chairing a high-level review meeting on road safety.

    You Missed

    SIO Goa Demands Public Apology, Accountability Over Withdrawn DoE Circular

    SIO Goa Demands Public Apology, Accountability Over Withdrawn DoE Circular

    Goa Can Become India’s First Zero Road Fatality State: Justice Abhay Sapre

    Goa Can Become India’s First Zero Road Fatality State: Justice Abhay Sapre

    १५ दिवसांत ३९ (ए) रद्द करा, अन्यथा…

    १५ दिवसांत ३९ (ए) रद्द करा, अन्यथा…

    रस्ते अपघात राज्य आपत्तीच !

    रस्ते अपघात राज्य आपत्तीच !

    17/07/2026 e-paper

    17/07/2026 e-paper

    Cruz Silva Urges CM’s Intervention Over Goa University PG Admission Crisis

    Cruz Silva Urges CM’s Intervention Over Goa University PG Admission Crisis