ई-२० पेट्रोलविरोधात‘ आप’चा निषेध मेळावा


गांवकारी, दि. ३१ (प्रतिनिधी)

सक्तीने लागू करण्यात आलेल्या ई-२० पेट्रोलविरोधात शनिवार १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पातळीवरील निषेध मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आम आदमी पार्टीने पणजीतील हिरा पेट्रोल पंपासमोर पत्रकार परिषद घेऊन गोमंतकियांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होणार असून, विविध तज्ज्ञांच्या उपस्थितीत वाहनधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा केली जाईल.
प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी सांगितले की, ई-२० पेट्रोलमुळे कमी मायलेज, वाढलेला देखभाल खर्च आणि इंजिनाशी संबंधित समस्या देशभरात वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी या धोरणाविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे.
नागरिकांनी सहभागी होण्यासाठी ८५८८८३३२१२ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप संदेश पाठवावा, त्यानंतर सहभागी होण्यासाठीची लिंक पाठवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपचे नेते गेल्या काही दिवसांत गोव्याच्या विविध भागांत वाहनधारक, मोटारसायकल पायलट आणि मेकॅनिक यांच्याशी संवाद साधत आहेत. सर्वत्र मायलेज घटल्याच्या, दुरुस्तीचा खर्च वाढल्याच्या आणि इंजिनाशी संबंधित तक्रारी समोर आल्या आहेत.
अनेक वाहनधारकांनी इंजिन जाम होणे, इंधन टाकीला गंज लागणे, गळती होणे अशा गंभीर समस्यांचा उल्लेख केला. मडगावमधील मोटारसायकल पायलटांनी कमी मायलेजमुळे रोजच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याची व्यथा मांडली.

  • Related Posts

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    This is an emotional plea from a Goan to Lord Ganesha, urging him to awaken the wisdom in the hearts of Goans to protect their land. The author expresses concern about unchecked development, the sale of land, and money-driven politics that threaten Goa’s natural beauty, cultural identity, and the future of its youth. The plea is for discernment, courage, and a collective resolve to prioritize Goa’s future over personal gain, ensuring it remains an invaluable homeland for generations to come.

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    A heartfelt plea from a Goan native to Lord Ganesha, urging for the preservation of Goa’s identity, land, and future against unchecked development, money-driven politics, and the commodification of ancestral land. The plea emphasizes the need for Goans to awaken, question leadership, and prioritize Goa’s future over personal gain.

    You Missed

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    आरजीपीच्या नव्या राज्य कार्यालयाचे उद्घाटन

    आरजीपीच्या नव्या राज्य कार्यालयाचे उद्घाटन

    ‘गोवा विकू देणार नाही’; काँग्रेसची २७ दिवसीय ‘गोंय राखण यात्रा’

    ‘गोवा विकू देणार नाही’; काँग्रेसची २७ दिवसीय ‘गोंय राखण यात्रा’

    गणेश विसर्जन स्थळाच्या स्वच्छतेसाठी ‘टुगेदर फॉर म्हापसा’चा पुढाकार

    गणेश विसर्जन स्थळाच्या स्वच्छतेसाठी ‘टुगेदर फॉर म्हापसा’चा पुढाकार