स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तालुकावार जागृती निदर्शने

१० मागण्यांच्या पूर्ततेसाठी आग्रह

गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी)

‘इनफ इज इनफ, गोवा’ चळवळीतर्फे येत्या १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जागृती निदर्शने करण्यात येणार आहेत. या वेळी चळवळीच्या १० प्रमुख मागण्यांविषयी जनजागृती केली जाणार असून, चळवळीच्या विविध उपक्रमांची माहितीही जनतेसमोर मांडली जाणार आहे.

आज आयोजित पत्रकार परिषदेत चळवळीचे सचिव देविदास आमोणकर यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी चळवळीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर, कोअर समितीचे सदस्य स्वप्नेश शेर्लेकर आणि निवृत्त आयपीएस अधिकारी बॉस्को जॉर्ज उपस्थित होते.

चळवळीतर्फे यापूर्वीच विधानसभेतील सर्व आमदारांना ‘गोवा कृषी संरक्षण विधेयक-२०२६’ सादर करण्यात आले आहे. मागील अधिवेशनात हे विधेयक चर्चेसाठी येणार होते; परंतु अधिवेशन रद्द झाल्यामुळे ते शक्य झाले नाही. आता तीन दिवसांच्या अधिवेशनात सरकारनेच हे विधेयक मंजूर करून घ्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

ही चळवळ भावी पिढीच्या सुरक्षेसाठी तसेच भविष्यातील गोवा सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विषयावर कायदेशीर तोडगा काढून लोकशाहीच्या तत्त्वांनुसार पुढे जाण्याचा निर्धार चळवळीने केला आहे.

मांडवी नदीतील कॅसिनो हटविण्यासाठी चळवळीतर्फे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेमुळेच मांडवीत येऊ घातलेले आणखी एक भयावह कॅसिनो जहाज रोखण्यात यश मिळाले. जोपर्यंत मांडवीतून कॅसिनो हटविले जात नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.

  • Related Posts

    Fresh Setback for Karapur Project as Court Keeps Title Dispute Alive

    A controversial Karapur-Sarvan development project faces a new legal setback as the Civil Judge, Senior Division, Bicholim, rejected applications to dismiss a civil suit challenging property rights. This comes after a stop-work order from the local panchayat and a temporarily suspended village agitation, adding further complexity to the project’s future.

    ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा

    देशभरातून मागणीला जोर; गोवा काँग्रेसकडूनही चौकशीची मागणी गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी) मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (एसआयआर) निर्माण झालेला वाद आता गोव्यातही तीव्र झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच…

    You Missed

    Fresh Setback for Karapur Project as Court Keeps Title Dispute Alive

    Fresh Setback for Karapur Project as Court Keeps Title Dispute Alive

    25/09/2026 e-paper

    25/09/2026 e-paper

    ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा

    ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा

    गोव्याची आर्थिक प्रगती की अधोगती?

    गोव्याची आर्थिक प्रगती की अधोगती?

    ‘Dilapidated’ Ganesh Mandap Hosts Chaturthi Celebrations; Prabhav Naik Seeks Answers

    ‘Dilapidated’ Ganesh Mandap Hosts Chaturthi Celebrations; Prabhav Naik Seeks Answers

    Sandeep Falari Announces Bid for BJP Ticket from Mapusa Assembly Constituency

    Sandeep Falari Announces Bid for BJP Ticket from Mapusa Assembly Constituency