पणजी, ३० ऑगस्ट २०२६ : रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने (RGP) आपल्या राज्य कार्यकारिणीची पुनर्रचना करत नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. शविना एस. नाईक शिरोडकर यांची पक्षाच्या राज्य अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीत विपिन नाईक यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मेल्विन डिसिल्व्हा यांची सरचिटणीसपदी, तर प्रेमानंद गावडे यांची संघटक सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
तसेच जयेंद्र पाडोलकर यांची सचिवपदी, तर कॅन्डिडो कोरिया यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार विरेश बोरकर यांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन केले.
आगामी राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरजीपीने राज्य संघटनेत केलेली ही पुनर्रचना महत्त्वाची मानली जात आहे. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे या बदलातून दिसून येत आहे.





