ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा

देशभरातून मागणीला जोर; गोवा काँग्रेसकडूनही चौकशीची मागणी

गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी)

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (एसआयआर) निर्माण झालेला वाद आता गोव्यातही तीव्र झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच इतर राजकीय व नागरी गटांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच गोवा काँग्रेसनेही ही मागणी पुढे रेटली आहे. काँग्रेस आमदार कार्लोस फेरेरा यांनी कुमार यांच्या कार्यपद्धतीची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली.

शुक्रवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, अॅड. अमित पालेकर आणि सावियो कुतिन्हो उपस्थित होते.

निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत मतदार नोंदणी, नावे वगळणे, फॉर्म-६ मधील बदल आणि मतदार यादीच्या डेटाबेसवरील नियंत्रणासह विविध निर्णयांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवल्याचे इंडियन एक्सप्रेसच्या तपास वृत्तात म्हटले आहे. एका प्रकरणात फॉर्म-६ मधील बदलाबाबत संधू यांनी ‘अनधिकृत आणि बेकायदा’ असा आक्षेप नोंदवल्याचेही वृत्त आहे.

फेरेरा यांनी एसआयआर प्रक्रियेत देशभरातील मसुदा मतदार याद्यांतून सुमारे १३ कोटी नावे वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र मसुदा यादीतून नाव वगळले जाणे म्हणजे अंतिमतः मतदानाचा अधिकार गमावणे नव्हे; दावे आणि हरकतींच्या प्रक्रियेत नावे पुन्हा समाविष्ट होऊ शकतात. या प्रक्रियेचा भाजपला फायदा करून देण्यासाठी वापर झाल्याचा आरोप फेरेरा यांनी केला.

गोव्यात १.२० लाख नावे वगळल्याचा दावा

अॅड. अमित पालेकर यांनी गोव्यात सुमारे १.२० लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा केला. यामध्ये कॅथलिक आणि मुस्लिम मतदारांची संख्या मोठी असल्याचा आरोपही त्यांनी केला. पालेकर यांनी गोमंतकीयांना मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करून घेण्याचे आणि चुकीच्या पद्धतीने नाव वगळले असल्यास त्याविरोधात दाद मागण्याचे आवाहन केले.

  • Related Posts

    ‘Dilapidated’ Ganesh Mandap Hosts Chaturthi Celebrations; Prabhav Naik Seeks Answers

    Madganvcho Awaaz and youth leader Prabhav Naik has questioned the justification for the proposed demolition and redevelopment of the Ganesh Mandap at the Margao Municipal Garden, pointing out that the structure—described in official correspondence as being in a “very dilapidated condition”—was used to host this year’s Ganesh Chaturthi celebrations.

    Sandeep Falari Announces Bid for BJP Ticket from Mapusa Assembly Constituency

    Sandeep Falari, a senior BJP functionary and former Mapusa Municipal Council chairperson, has announced his intention to contest the forthcoming Goa Assembly election from the 05–Mapusa Assembly Constituency, seeking the BJP nomination.

    You Missed

    25/09/2026 e-paper

    25/09/2026 e-paper

    ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा

    ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा

    गोव्याची आर्थिक प्रगती की अधोगती?

    गोव्याची आर्थिक प्रगती की अधोगती?

    ‘Dilapidated’ Ganesh Mandap Hosts Chaturthi Celebrations; Prabhav Naik Seeks Answers

    ‘Dilapidated’ Ganesh Mandap Hosts Chaturthi Celebrations; Prabhav Naik Seeks Answers

    Sandeep Falari Announces Bid for BJP Ticket from Mapusa Assembly Constituency

    Sandeep Falari Announces Bid for BJP Ticket from Mapusa Assembly Constituency

    अँटनींच्या पुत्राला गोवा सह-प्रभारीपद; पर्रीकरांच्या पुत्राबाबत भाजपची भूमिका काय?

    अँटनींच्या पुत्राला गोवा सह-प्रभारीपद; पर्रीकरांच्या पुत्राबाबत भाजपची भूमिका काय?