पुढील २५ वर्षांसाठी लोकसहभागी, उत्तरदायी विधानसभेचा आराखडा तयार करा : ओम बिर्ला

पणजी, ६ ऑक्टोबर: गोव्याच्या विकासाचा वेग कायम राखताना राज्याची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, वारसा आणि नैसर्गिक पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आव्हानात्मक पण तितकीच महत्त्वाची जबाबदारी असल्याचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. गोवा विधानसभेच्या सध्याच्या इमारतीतील २५ वर्षांच्या वाटचालीच्या निमित्ताने आयोजित रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.

गोव्याने पर्यटन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले असून विकासाच्या या प्रक्रियेत गोमंतकीयांचा सन्मान आणि जीवनमानाचा दर्जा टिकविण्याचे प्रयत्न झाले आहेत, असे बिर्ला म्हणाले. विविध धोरणे, कायदे आणि जनताभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून राज्याच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या तत्कालीन सरकारे आणि लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

रौप्यमहोत्सव हा केवळ गेल्या २५ वर्षांच्या कामगिरीचा उत्सव न राहता पुढील २५ वर्षांची दिशा निश्चित करण्याची संधी ठरली पाहिजे, असे बिर्ला यांनी सांगितले. ‘विकसित भारत’च्या संकल्पनेशी सुसंगत असा भविष्यवेधी आराखडा गोवा विधानसभेने तयार करावा आणि त्यामध्ये नागरिक, युवा तसेच महिलांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन त्यांनी केले.

विधानसभा ही प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा आणि अपेक्षांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था असल्याची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. विशेषतः समाजातील वंचित घटकांना आपले प्रश्न आणि अपेक्षांना विधानसभेत स्थान मिळते, असा विश्वास वाटला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

पुढील २५ वर्षांत लोकशाही संस्था अधिक मजबूत करण्याबरोबरच त्या अधिक सुलभ, उत्तरदायी, प्रतिसादक्षम आणि निकालाभिमुख करण्यावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. कायदेमंडळाच्या कामकाजात जनतेचा सहभाग वाढल्यास लोकशाही संस्था नागरिकांप्रती अधिक जबाबदार आणि उत्तरदायी बनतील, असेही ते म्हणाले.

गोवा विधानसभेने सध्याच्या इमारतीतील २५ वर्षांची वाटचाल पूर्ण केल्याबद्दल बिर्ला यांनी अभिनंदन केले. राज्याची संस्कृती, वारसा आणि नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करत गोव्याच्या आर्थिक व सामाजिक विकासात विधानसभा यापुढेही महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या विकासात आणि लोकशाही संस्था बळकट करण्यात योगदान दिलेल्या विद्यमान व माजी आमदार, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि अन्य लोकप्रतिनिधींनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात बिर्ला यांच्या हस्ते गोवा विधानसभा आणि सचिवालय इमारतीच्या ‘कस्टमाइज्ड माय स्टॅम्प’ तसेच विशेष टपाल पाकिटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विधानसभा अध्यक्ष डॉ. गणेश गावकर, विधिमंडळ कामकाज मंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह अन्य मान्यवरांनी कार्यक्रमात विचार मांडले. डॉ. गणेश गावकर यांनी स्वागत केले, तर उपसभापती जोशुआ पीटर डिसोझा यांनी आभार मानले.

  • Related Posts

    Architecture Students Flag ‘Unfair’ Building Construction Exam, Viva; Seek Goa University Intervention

    Students of the Goa College of Architecture have raised serious concerns over their Building Construction examination and viva, citing an excessively lengthy paper, impractical drafting scale, and faculty arrangements that differed from communicated information. They seek Goa University intervention to ensure fairness and protect academic interests.

    धारगळ जमीन प्रकरण ‘एसआयटी’ कडे

    ‘भाटकारा’च्या मूळ जमीन हक्कांची होणार छाननी गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी) धारगळमधील मोठ्या प्रमाणातील जमीन आराबेकर देसाई भाटकाराच्या नावे नेमकी कशी आली, तिची मूळ मालकी काय आणि त्यासाठी कोणत्या दस्तऐवजांच्या आधारे…

    You Missed

    पुढील २५ वर्षांसाठी लोकसहभागी, उत्तरदायी विधानसभेचा आराखडा तयार करा : ओम बिर्ला

    पुढील २५ वर्षांसाठी लोकसहभागी, उत्तरदायी विधानसभेचा आराखडा तयार करा : ओम बिर्ला

    Architecture Students Flag ‘Unfair’ Building Construction Exam, Viva; Seek Goa University Intervention

    Architecture Students Flag ‘Unfair’ Building Construction Exam, Viva; Seek Goa University Intervention

    06/10/2026 e-paper

    06/10/2026 e-paper

    धारगळ जमीन प्रकरण ‘एसआयटी’ कडे

    धारगळ जमीन प्रकरण ‘एसआयटी’ कडे

    रौप्यमहोत्सवाचा हा कसला ‘इव्हेंट’ ?

    रौप्यमहोत्सवाचा हा कसला ‘इव्हेंट’ ?

    ‘Silver Jubilee’ in the 27th Year? Vijai Sardesai Boycotts Assembly Celebration, Refuses Felicitation

    ‘Silver Jubilee’ in the 27th Year? Vijai Sardesai Boycotts Assembly Celebration, Refuses Felicitation