दोन लाख महिला तीन हजारांच्या प्रतीक्षेत !

आमदार विजय सरदेसाई यांचा हल्लाबोल


गांवकारी,दि.२४(प्रतिनिधी)

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या नावाखाली भाजप सरकार मोठमोठ्या घोषणा आणि प्रसिद्धी करत असले तरी प्रत्यक्ष लाभ देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. एकूण ३ लाख ६ हजार ३९६ अर्जदारांपैकी केवळ सुमारे एक लाख जणांना प्रत्येकी तीन हजार रुपये मिळाले असून दोन लाखांहून अधिक अर्जदार महिला अजूनही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
विजय सरदेसाई यांनी समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या घोषणा प्रसिद्धीत मोठ्या असतात, मात्र त्या वेळेवर पूर्ण करण्याच्या बाबतीत सरकारची कामगिरी शून्य असल्याचा टोला त्यांनी लगावला.

महिलांना मोठमोठ्या घोषणा, जाहिरातबाजी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले दिखाऊ कार्यक्रम नकोत. सरकारने आश्वासन दिलेली आर्थिक मदत त्यांना प्रत्यक्ष मिळणे आवश्यक आहे, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

गृहआधार योजनेचा लाभ वेळेत मिळावा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत गृहआधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र, आर्थिक मदत मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि प्रलंबित प्रकरणांमुळे सरकारच्या आश्वासनाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
१० मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही योजनांच्या २.२४ लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यांत ४५.२६ कोटी रुपये जमा केल्याची माहिती दिली होती. यापुढे आर्थिक मदतीच्या वितरणात विलंब होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
विशेष म्हणजे, १७ ऑक्टोबर रोजी काणकोण येथे आयोजित ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात गृहआधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनांसंबंधी अनेक तक्रारी मांडण्यात आल्या. महिला सक्षमीकरणाचा दावा करणाऱ्या सरकारने केवळ योजनांच्या जाहिराती आणि निधी वितरणाच्या घोषणांपुरते मर्यादित न राहता पात्र महिलांना नियमितपणे आर्थिक मदत मिळेल, याची खात्री करणे आवश्यक आहे, असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.

  • Related Posts

    ५०० कोटींचा हिशेब!

    रोहन, मायकल निरुत्तर गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्येक आमदाराला दरवर्षी १०० कोटी रुपयांचा विकासनिधी दिल्याचे जाहीर केले होते. मग गेल्या पाच वर्षांत कळंगुट मतदारसंघात ५००…

    फातोर्ड्यात वोट चोरी उघड

    आमदार विजय सरदेसाई यांचा आरोप गांवकारी,दि.१७(प्रतिनिधी) फातोर्डा मतदारसंघातील मतदारयादीतून तब्बल साडेचार हजार पात्र मतदारांची नावे वगळण्यात आली असून, मागील दोन निवडणुकांत कुडतरी मतदारसंघात मतदान केलेल्या ५० मतदारांची नावे फातोर्डा मतदारसंघात…

    You Missed

    24/10/2026 e-paper

    24/10/2026 e-paper

    दोन लाख महिला तीन हजारांच्या प्रतीक्षेत !

    दोन लाख महिला तीन हजारांच्या प्रतीक्षेत !

    उत्पल – पार्सेकर घरवापसी; भाजपात अस्वस्थता

    उत्पल – पार्सेकर घरवापसी; भाजपात अस्वस्थता

    वकिल संघटनेचे अभिनंदन !

    वकिल संघटनेचे अभिनंदन !

    Over Two Lakh Women Still Await ₹3,000 Assistance: Vijai Sardesai Slams BJP Government

    Over Two Lakh Women Still Await ₹3,000 Assistance: Vijai Sardesai Slams BJP Government

    ५०० कोटींचा हिशेब!

    ५०० कोटींचा हिशेब!