गोवा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुरेश नाईक

पणजी, दि. २५ : गोवा मराठी पत्रकार संघाच्या २०२६ ते २०२८ या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली असून, ज्येष्ठ पत्रकार सुरेश स. नाईक यांची संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह कार्यकारिणीच्या सर्व अकरा जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश काणकोणकर यांनी उमेदवारी अर्जांची छाननी आणि अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर केला. कार्यकारिणी सदस्यपदासाठी अर्ज दाखल केलेले गुरुदास सावळ यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने संपूर्ण कार्यकारिणीची निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

नवनिर्वाचित कार्यकारिणीत गंगाराम म्हांबरे आणि विठ्ठल गावडे पारवडकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. सुभाष कृ. नाईक हे सचिवपदी कायम राहणार असून, नितीन कोरगावकर यांची संयुक्त सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

कार्यकारिणी सदस्य म्हणून अरविंद धुरी, निलेश नाईक, दत्ता शिरोडकर, अनुया शिरोडकर, अनुराधा मोघे आणि वामन प्रभू यांची निवड झाली आहे.

दरम्यान, गोवा मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पणजी येथील गुज हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या सभेत नवनिर्वाचित कार्यकारिणीकडे संघाचा अधिकृत कार्यभार सोपविण्यात येणार आहे.

  • Related Posts

    Court Quashes Permission Order for 54 Cottages, Six Restaurants in Anjuna

    The North Goa Principal District Court has quashed an order allowing construction of 54 temporary wooden cottages and six restaurants in Anjuna, upholding objections from the Anjuna-Caisua Village Panchayat due to environmental concerns and alleged violation of GCZMA conditions.

    One Constitution, One Nation, Two Rules for Casino Entry in Goa?

    Despite a 2021 High Court ruling upholding restrictions on Goan residents entering casinos, questions persist regarding the lack of transparent mechanisms for tourist permits and enforcement of gambling laws in Goa.

    You Missed

    गोवा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुरेश नाईक

    गोवा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुरेश नाईक

    Court Quashes Permission Order for 54 Cottages, Six Restaurants in Anjuna

    Court Quashes Permission Order for 54 Cottages, Six Restaurants in Anjuna

    One Constitution, One Nation, Two Rules for Casino Entry in Goa?

    One Constitution, One Nation, Two Rules for Casino Entry in Goa?

    Casino Advertisements Across Goa Raise Questions Over Enforcement of Gambling Law

    Casino Advertisements Across Goa Raise Questions Over Enforcement of Gambling Law

    पणजी स्मार्ट सिटीच्या १,१०० कोटींच्या खर्चाचा हिशेब कुठे?

    पणजी स्मार्ट सिटीच्या १,१०० कोटींच्या खर्चाचा हिशेब कुठे?

    ₹3.50-Crore Luxury Car with Police Escort: Girish Chodankar Questions CM Sawant

    ₹3.50-Crore Luxury Car with Police Escort: Girish Chodankar Questions CM Sawant