‘कमळ बघ, मतदान कर’!

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी)

भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्ती नव्हे तर केवळ ‘कमळ’ हाच उमेदवार समजून काम करावे आणि संघटीतरित्या काम करून भाजपचे आमदार निवडून आणावेत, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून निर्माण होणारे मतभेद आणि अंतर्गत स्पर्धा पक्षाच्या कामगिरीवर परिणाम करू शकतात,असेही त्यांनी सुचित केले.
भाजप राज्य कार्यकारिणीला संबोधत करत असताना दामू नाईक यांनी कार्यकर्त्यांना आगामी विधानसभेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. राज्यात भाजपची सुमारे साडेचार लाख सदस्यसंख्या असल्याचा दावा करून पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचे मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.


लोकसभा निवडणुकीत गोव्यात भाजपला ५२ टक्के मते मिळाली होती, तर विधानसभा निवडणुकीत तितकेच मताधिक्य का मिळू शकत नाही, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर उपस्थित केला. आपापसातील मत्सर, हेवेदावे आणि गटबाजी बाजूला ठेवून एकजुटीने निवडणुकीला सामोरे जा, असे आवाहन त्यांनी केले.

गोवा कुणी विकला? काँग्रेसला थेट सवाल

काँग्रेसच्या ‘गोंय राखोण यात्रे’तील ‘गोंय विकले, काबार केले’ या घोषणेवरही दामू नाईक यांनी जोरदार टीका केली. गोवा नेमका कुणी विकला, असा प्रतिप्रश्न करत त्यांनी काँग्रेसच्या पूर्वीच्या राजवटीवर निशाणा साधला.
गोव्यात पहिला कॅसिनो आणण्याचे काम काँग्रेसच्या काळातच झाले, असा आरोप त्यांनी केला. दक्षिण गोव्यात विविध इमारतींमध्ये २१ हॉटेलांना परवानगी देण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला. गोव्याच्या जमिनी, पर्यटन व्यवसाय आणि विकासाच्या मुद्द्यांवर भाजपला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसने स्वतःच्या राजवटीतील निर्णयांचाही हिशेब द्यावा, असा त्यांच्या टीकेचा रोख होता. काँग्रेसच्या सत्ताकाळात उत्तर आणि दक्षिण गोवा यांच्यात विभागणीची भावना निर्माण झाली होती. मात्र, भाजप सत्तेवर आल्यानंतर हे अंतर दूर करण्याचे प्रयत्न झाले, असा दावा नाईक यांनी केला. भाजपने समाजाला एकत्र आणून राज्याच्या विकासाला चालना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

  • Related Posts

    Amit Patkar Launches ‘Super Me’ Campaign to Fight Drug Abuse Among Schoolchildren

    Former GPCC President Amit Patkar launched the ‘Super Me’ awareness campaign at Sarvodaya High School, Curchorem, to combat drug abuse and mental health challenges among schoolchildren. The ‘Yes to Life, Yes to Help’ initiative aims to promote drug awareness, mental well-being, and a supportive environment.

    Chodankar Alleges ₹5,000-Crore Dona Paula Land Scam, Questions BJP Government’s PPP Deal

    GPCC President Girish Chodankar has accused the BJP-led government of a ₹5,000-crore land scam in Dona Paula, questioning a PPP deal for prime land valued at ₹5,100 crore offered for just ₹108 crore upfront. Congress vows to scrap the convention centre project if voted to power in 2027, alleging the project sacrifices Goan youth’s employment prospects for commercial exploitation.

    You Missed

    Amit Patkar Launches ‘Super Me’ Campaign to Fight Drug Abuse Among Schoolchildren

    Amit Patkar Launches ‘Super Me’ Campaign to Fight Drug Abuse Among Schoolchildren

    मैदानात यशचा डंका; सरकार दरबारी मात्र उपेक्षाच !

    मैदानात यशचा डंका; सरकार दरबारी मात्र उपेक्षाच !

    27/10/2026 e-paper

    27/10/2026 e-paper

    ‘कमळ बघ, मतदान कर’!

    ‘कमळ बघ, मतदान कर’!

    घोषणा नकोत, दरारा हवा !

    घोषणा नकोत, दरारा हवा !

    Chodankar Alleges ₹5,000-Crore Dona Paula Land Scam, Questions BJP Government’s PPP Deal

    Chodankar Alleges ₹5,000-Crore Dona Paula Land Scam, Questions BJP Government’s PPP Deal